शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

By admin | Updated: June 11, 2016 00:50 IST

राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षामार्फत शुक्रवारी विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली

पुणे : राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षामार्फत शुक्रवारी विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. गुणवत्ता यादीतील क्रमांकानुसार दि. १४ जूनपासून प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.सीईटी कक्षामार्फत घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता; मात्र वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व खेळाडू असलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. खेळाडू विद्यार्थ्यांकडून कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. कक्षाकडे आलेल्या कागदपत्रांनुसार संबंधित विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देऊन शुक्रवारी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना सीईटीतील गुण व गुणवत्ता यादीतील क्रमांक असलेली गुणपत्रिका मिळण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. या यादीतील क्रमांकानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विभागीय केंद्रांवर उपस्थित राहावे लागणार आहे. ही प्रक्रिया दि. १४ जून ते २ जुलै या कालावधीत पार पडणार आहे. वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रवेशाबाबतची माहितीपुस्तिका शनिवारपासून उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी सीईटी गुणपत्रिका व आवश्यक कागदपत्रांसह विभागीय केंद्रांवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. याठिकाणी दिलेल्या वेळेत समुपदेशन व पसंती अर्ज भरून घेतले जातील. त्यानंतर प्रवेशाची निवड यादी जाहीर केले जाईल. आवश्यक कागदपत्रे नसल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला जाऊ शकतो. >पसंती क्रम अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रेअधिकृत ओळखपत्र (शाळा-महाविद्यालय ओळखपत्र, आधार कार्ड, दहावी किंवा तत्सम परीक्षेचे प्रवेशपत्र यांपैकी कोणतेही एक).आॅनलाइन डाऊनलोड केलेला प्रवेश अर्ज, एमएटी-सीईटी २०१६ चे प्रवेशपत्र.दि. १० जूननंतर डाऊनलोड केलेले सीईटीचे गुणपत्रक, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, बारावीची गुणपत्रिका, दहावी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र (जन्म तारखेसाठी), दहावीची गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र (आरक्षणासाठी), इतर कोट्यातील आरक्षणासाठी आवश्यक प्रमाणपत्र.>विभागीय केंद्र मुंबई - ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, सर जे. जे. हॉस्पिटल कॅम्पस, भायखळा, पुणे - बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, ससून हॉस्पिटल कॅम्पस, औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, घाटी हॉस्पिटल कॅम्पस, नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हनुमान नगर.