बायको दारू पिल्याचा मनात राग, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून; रिक्षाचालक गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 09:38 IST2023-01-31T09:37:29+5:302023-01-31T09:38:03+5:30

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक केली...

Anger in the heart of wife drinking alcohol, beaten and killed by kicking; Rickshaw driver Gajaad | बायको दारू पिल्याचा मनात राग, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून; रिक्षाचालक गजाआड

बायको दारू पिल्याचा मनात राग, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून; रिक्षाचालक गजाआड

पुणे/किरण शिंदे : जेवण न दिल्याने आणि मद्यप्राशन केल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आहे. बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर मध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक केली आहे. 

सविता संदीप औचिते (वय 32) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पती परशुराम उदडंपा जोगण (वय 38) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. गणेश दत्तात्रय शिंदे (वय 38) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी परशुराम जोगन हा फिर्यादी यांच्या रिक्षावर ड्रायव्हर म्हणून काम करतो. मयत महिला सविता ही आरोपीची दुसरी पत्नी आहे. दरम्यान सोमवारी सविता हिने जेवण दिले नाही आणि दारू पिली याचा राग मनात धरून आरोपीने तिला शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. सविता अवचिते या महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Anger in the heart of wife drinking alcohol, beaten and killed by kicking; Rickshaw driver Gajaad