शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

खुन्नस दिल्याचा राग अन् कोयत्याने सपासप वार..! तरुणाच्या खुनाने पुणे हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 17:25 IST

साई सिध्दी चौकात पान टपरीवरून झालेल्या किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला.

पुणे - साई सिध्दी चौकात पान टपरीवरून झालेल्या किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.अधिकच्या माहितीनुसार, मृत युवकाचे नाव आर्यन साळवे (वय २५, रा. सटाणा, जि. नाशिक) असून, धैर्यशील मोरे (वय ३०, रा. साई सिध्दी चौक) याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत  वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन साळवे अवघ्या १८ दिवसांपूर्वी मामाकडे राहण्यासाठी आंबेगाव पठार, पुणे येथे आला होता. तो एका सलूनमध्ये नोकरी करत होता. शुक्रवारी रात्री सुमारे साडेदहा वाजताच्या सुमारास तो पान खाण्यासाठी साई सिध्दी चौकातील टपरीवर गेला असताना आरोपी धैर्यशील मोरे तिथे सिगारेट पित उभा होता. धैर्यशील मोरे याने आर्यन साळवेने ‘पाहिलं का?’ असा जाब विचारत वाद घातला. दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.या दरम्यान, धैर्यशील मोरे याने धारदार कोयत्याने आर्यनवर सपासप वार केले. हल्ल्याचा प्रतिकार करताना आर्यनची बोटे तुटली. गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले; मात्र शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. उपनिरीक्षक प्रियंका निकम या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPune Crimeपुणे क्राईम बातम्या