शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पुणे जिल्हयातील अंगणवाडी सेविका होणार स्मार्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 13:36 IST

जिल्ह्यात जवळपास ४ हजार ६०२ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांचे काम वेगवान करण्यासाठी आणि मुलांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ‘आयसीडीएस सीएएस’ या मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रशिक्षण देण्यास सुरुवात : कामे होणार वेगवान, राज्य सरकार देणार मोबाईल संचवेगवान काम आणि चांगल्या सुविधा देण्यासाठी ‘आयसीडीएस सीएएस’ मोबाईल अ‍ॅपची निर्मितीसध्या २०० मोबाईल सेविकांना जिल्ह्यातील अंगणड्यांच्या पर्यवेक्षकांना प्रशिक्षण सुरुवातदैैनंदिन माहिती भरताना तसेच मोबाईल सांभाळताना सेविकांना काळजी घ्यावी लागणार‘सही पोषण, देश रोशन’ उपक्रमांतर्गत ‘आयसीडीएस सीएएस’ या मोबाईल अ‍ॅपची निर्मिती

पुणे : जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे कामकाज अधिक वेगवान करण्यासाठी तसेच कामे पेपरलेस करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या ‘सही पोषण, देश रोशन’ उपक्रमांतर्गत ‘आयसीडीएस सीएएस’ या मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातूनच संबंधित अंगणवाडीसेविका व मदतनीस या नोंदी ठेवू शकणार आहेत.  यासाठी अंगणवाडीसेविका व मदतनिसांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली असून, ३० मेपर्यंत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या २०० मोबाईल सेविकांना देण्यात आले असून, याद्वारे हे प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे लवकरच जिल्ह्यातील अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत. जिल्ह्यात जवळपास ४ हजार ६०२ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांचे काम वेगवान करण्यासाठी आणि मुलांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ‘आयसीडीएस सीएएस’ या मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अ‍ॅपचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून पर्यवेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकाºयांना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी सध्या २०० मोबाईल राज्य सरकारतर्फे उपलब्ध करून देण्यात आले असून, येत्या काळात सर्व अंगणवाडीसेविका आणि कर्मचाºयांना  मोबाईलचा ऑनलाइन यंत्रणेसाठी कसा वापर करायचा यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ‘जून महिन्यापासून सर्व अंगणवाड्यांचा कारभार हा ऑनलाईन नोंदीद्वारे चालूणार आहे. यामध्ये लसीकरण, गृहभेटी, बालकांच्या दैनंदिन नोंदी, स्तनदा माता, गरोदरमाता आणि मुलींच्या आरोग्याच्या नोंदींचा समावेश असेल. प्रत्येक सेविकेला मोबाईलमध्ये ह्यकॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअरह्ण (कॅस) या अ‍ॅपद्वारे माहिती भरता येणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान मोबाईलमधील अ‍ॅप आणि सिमकार्ड सुरू करण्यात येणार आहेत. अंगणवाडी सेविका दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवतात. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजन, उंचीच्या नोंदी, लसीकरण आदींच्या नोंदी रजिस्टरमध्ये घेत आहेत. या पुढे अंगणवाडी सेविकांना आता रजिस्टर हाताने लिहिण्याची गरज राहणार नाही. या प्रशिक्षणानंतर त्या कर्मचाºयांना स्मार्टफोनमधील अ‍ॅपद्वारे माहिती द्यावी लागणार आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.प्रशिक्षणानंतर मोबाईल अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार आहे. या द्वारे बालकांची दैनंदिन माहिती त्यांना मोबाईलद्वारे अपडेट करावयाची आहे. हा मोबाईल कसा हाताळावा यासाठी हे प्रशिक्षण आहे. दैैनंदिन माहिती भरताना तसेच मोबाईल सांभाळताना सेविकांना काळजी घ्यावी लागणार आहे. 

.............. जिल्ह्यातील अंगणड्यांच्या पर्यवेक्षकांना प्रशिक्षण सुरुवात झाली आहे. त्यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या हाताखालील सेविकांना प्रशिक्षण द्यायचे आहे. प्रत्येक तालुक्यात टप्प्याटप्प्याने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये पर्यवेक्षक, बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच जिल्ह्यातील प्रातिनिधिक अंगणवाडी सेविका असे एकूण सुमारे दोनशे जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण लोणावळा येथे सुरू आहे. ज्यांना स्मार्ट फोन वापरता येत नाही त्यांच्या आवाजावरून (व्हाइसद्वारे) देखील रेकॉर्डची माहिती भरली जाणार आहे. - दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग.  

टॅग्स :Puneपुणेdigitalडिजिटलonlineऑनलाइन