शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

ट्रान्सफॉर्मर स्फोटातील ‘त्या दोघांची’मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 2:47 PM

खराडी एमआयडीसी झेन्सार आयटी पार्कच्या ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात युवक व युवती गंभीर भाजल्याची घटना गेल्या महिन्यात ११ मे रोेजी घडली होती.

ठळक मुद्देखराडी येथे महिन्याभरापूर्वी घडलेली दुर्दैवी घटना मृत युवक आणि युवती हे झेन्सार आयटीपार्कमधील कंपनीत नोकरीला

चंदननगर: खराडी बाहयवळण मार्गावरील पदपथावर असलेल्या महाावितरणच्या रोहित्राचा स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या आयटी कंपनीतील नोकरीला  असलेल्या युवक व युवकाचा खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. खराडीतील झेन्सार आयटी पार्कलगत असलेल्या पदपथावर ११ मे रोजी सायंकाळी ही दुर्घटना घडली होती. प्रियांका झगडे (वय २४,रा.सातारा) आणि पंकज खुणे (वय २६,रा. वर्धा) ही दोघे गंभीर जखमी झाले होते. महिन्याभरापासून त्या दोघांची मृत्यूशी झुंज सुरु होती. ती अखेर अयशस्वी ठरली. उपचारादरम्यान पंकज याचा काल (दि. १५ जून ) व प्रियंका हिचा शनिवारी (दि.१६जून ) रोजी मृत्यू झाला.   खराडी बाहयवळण मार्गावर झेन्सार आयटी कंपनीनजीक असलेल्या पदपथावर महावितरणचा ट्रान्सफॉर्मर आहे. ११ मे रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास रोहित्राचा अचानक स्फोट झाला. त्यावेळी तेथून निघालेली प्रियंका आणि पंकज यांच्या अंगावर रोहित्रातील गरम आॅईल उडाल्याने ते गंभीर जखमी झाले. पदपथालगत असलेल्या सँडविच विक्रीच्या स्टॉलला झळ पोहोचली. गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, प्रियांका आणि पंकज यांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याचे चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी सांगितले. पदपथावर असलेल्या खाद्यापदार्थ विक्रीच्या स्टॉलला आग लागून दुर्घटना घडल्याचा अहवाल महावितरणकडून देण्यात आला आहे. याबाबत विद्युत निरीक्षकांनी दिलेल्या अहवालाची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल,असे पोलीस निरीक्षक मुळीक यांनी स्पष्ट केले. या घटनेत आयटी कंपनीतील कर्मचारी प्रियंका झगडे आणि पंकज खुणे यांचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात गेले महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराचा खर्च परवडत नसल्याने अखेर पंकजच्या कुटुंबीय त्याला घरी घेऊन गेले. जवळपास आठ लाख रुपये रूग्णालयाचे बिल पंकजच्या कुटुंबीयांना आले होते. महावितरणने जबाबदारी झटकली, अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी ते ईआॅन आयटी पार्क रस्त्यावरील खराडी एमआयडी रस्त्यावर कंपनीचा मोठा ट्रान्सफॉर्मर आहे. ११ मे रोजी संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान या ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट झाला होता. सदर घटनेतील जखमी युवक आणि युवती हे झेन्सार आयटीपार्कमधील कंपनीत नोकरीला होते. ......................

टॅग्स :Chandan NagarचंदननगरmahavitaranमहावितरणDeathमृत्यूPoliceपोलिस