गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 09:27 AM2019-08-27T09:27:35+5:302019-08-27T09:30:18+5:30

गायक आनंद शिंदे हे रात्री पुण्याहून सोलापूरला तवेरा गाडीने जात होते.

Anand Shinde's car accident at pune- solapur road in indapur | गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

googlenewsNext

पुणे : प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे -सोलापूर रोडवर अपघात झाला. या अपघातात आनंद शिंदे थोडक्यात बचावले. यात आनंद शिंदे यांच्यासह ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे -सोलापूर रोडवरील वरकुटे फाटा येथे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, गायक आनंद शिंदे हे रात्री पुण्याहून सोलापूरला तवेरा गाडीने जात होते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास इंदापूरजवळील वरकुटे फाटा येथे आनंद शिंदे यांच्या गाडीच्या चालकाला पुढे जाणारा डंपर दिसला नाही. चालकाने डंपरला पाठीमागून धडक दिली. त्यात आनंद शिंदे यांच्या पायाला मुका मार लागला आहे. त्यांच्यावर इंदापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर ते पुण्याला परतले. 

दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात गाडीचे किरकोळ नुकसान झाले असून त्यांनी आपली काहीही तक्रार नसल्याचे सांगितले, असल्याचे इंदापूर पोलिसांनी सांगितले.

Web Title: Anand Shinde's car accident at pune- solapur road in indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.