Pune Crime: ज्याच्या घरात बसून दारू रिचवली त्याच्यावरच कुऱ्हाडीने वार
By नितीश गोवंडे | Updated: October 5, 2023 16:52 IST2023-10-05T16:51:03+5:302023-10-05T16:52:17+5:30
वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

Pune Crime: ज्याच्या घरात बसून दारू रिचवली त्याच्यावरच कुऱ्हाडीने वार
पुणे : ज्याच्या घरात दारू पित बसले, त्याच्याच डोक्यात किरकोळ वादातून दुसऱ्या मित्राने कुऱ्हाडीने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जावेद मुजावर (५०, रा. मुक्तानंद सोसायटी, फातिमानगर, वानवडी) असे जमखीचे नाव असून, याप्रकरणी जावेद यांची पत्नी नाजमीन मुजावर (४८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिजाय शेख (५०, रा. मंडई) याच्याविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाजमीन यांचे मुक्तानंद सोसायटी येथे रो हाऊस आहे. ३ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास जावेद आणि रिजाज हे घराच्या बागेतील पत्र्याच्या खोलीमध्ये दारू पित बसले होते. यावेळी त्यांच्यात पैशावरून वाद सुरू झाला. तेव्हा रियाजने बागेतील झाडे कापण्यासाठी वापरत असलेल्या कुऱ्हाडीच्या सहाय्याने जावेद यांच्या कानावर, हातावर आणि डोक्यात वार करत त्यांना गंभीर जखमी केले.
जावेद यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून नाजमीन या तेथे गेल्या असता, रियाजने पोलिसांकडे तक्रार केली कर बघून घेईन अशी धमकी देत, तेथून पळ काढला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गिरमकर करत आहेत.