दारूच्या नशेत पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; तोंड, हात आणि छातीला भाजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 13:47 IST2022-05-29T13:47:20+5:302022-05-29T13:47:27+5:30

पहिल्या पतीच्या मुलाबरोबर झालेले भांडण सोडविल्याच्या रागातून पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला

An attempt to burn his wife by pouring petrol on her Burns on mouth, hands and chest | दारूच्या नशेत पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; तोंड, हात आणि छातीला भाजले

दारूच्या नशेत पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; तोंड, हात आणि छातीला भाजले

पुणे : पहिल्या पतीच्या मुलाबरोबर झालेले भांडण सोडविल्याच्या रागातून पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक देवाची ऊरळीमध्ये घडला आहे.

याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ लक्ष्मण वाघमोडे (वय ४०, रा. देवाची ऊरळी) याला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ वाघमारे हा ट्रकचालक असून, फिर्यादीचा पती आहे. फिर्यादी यांना पहिल्या पतीचा शेखर (वय २०) हा मुलगा आहे. सोमनाथ याने शेखर यास गाडीची चावी दिली नाही म्हणून चापट मारली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेली होती. सोमनाथ हा दारूच्या नशेत होता. त्याने रागाच्या भरात पेट्रोल आणून फिर्यादीच्या अंगावर टाकून तुला आता मारून टाकतो असे बोलून माचिसची काडी लावून पेटवून दिले. यात फिर्यादीचे तोंडाला, डाव्या हाताला व छातीला भाजले आहे़ फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हंबीर तपास करीत आहेत.

Web Title: An attempt to burn his wife by pouring petrol on her Burns on mouth, hands and chest