पुणे पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता, डॉ. के. व्यंकटेशम यांची अपर पोलीस महासंचालकपदी बदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 23:44 IST2020-09-17T23:43:17+5:302020-09-17T23:44:08+5:30
पुणे ग्रामीणच्या अधीक्षकपदी अभिनव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

पुणे पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता, डॉ. के. व्यंकटेशम यांची अपर पोलीस महासंचालकपदी बदली
पुणे : पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी गृह मंत्रालयातील प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणच्या अधीक्षकपदी अभिनव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.
डॉ. के. व्यंकटेशम हे नागपूर पोलीस आयुक्तपदावरुन ८ ऑगस्ट २०१८ रोजी पुणे पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले होते. या बदलीच्या आदेशात पोलीस महासंचालकांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती विचारात घेऊन डॉ. के. व्यंकटेशम यांना बदलीच्या ठिकाणी नियुक्त होण्याकरीता कार्यमुक्त करावे. त्यानंतर संबंधित अधिकारी यांनी बदलीच्या पदावर रुजू होऊन तसा अहवाल शासनास सादर करावा, असे या आदेशात म्हटले आहे.
अमिताभ गुप्ता यांनी १९९० मध्ये प्रसिद्ध कानपूर आयआयटी मधून बी टेकची पदवी प्राप्त केली. तरीही त्यांनी सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्यासाठी अभ्यास करण्याकरीता घरीच राहणे पसंत केले होते. त्यांची निवड भारतीय पोलीस दलात महाराष्ट्र केडरमध्ये झाली. त्यांनी नक्षलग्रस्त भाग असलेल्या भंडारा जिल्ह्यात आपल्या पोलीस सेवेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी थेट गडचिरोली पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली. उस्मानाबाद, नांदेड येथे अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांची मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली होती. त्यानंतर त्यांनी एसआरपीएफमध्ये बदली झाली होती.
गेल्या २ वर्षात पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. अनेक नवनवीन उपक्रम पुण्यात सुरु केले आहेत.