शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

अमित भारद्वाजच्या पाच कंपन्या असल्याचे तपासात उघड : १५ कोटी रुपये हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 8:55 PM

गेनबिटकॉईन मधील फसवणुकीची व्यापी लक्षात घेऊन सायबर सेलकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे़. या विशेष तपास पथकाने अमित भारद्वाजच्या भारतात पाच कंपन्या असल्याचे निष्पन्न केले आहे़.

ठळक मुद्देसायबर क्राईम सेल येथे आतापर्यंत ७३ साक्षीदारांची अंदाजे ७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर फरार आरोपींच्या शोधाकरिता सायबर विभागाकडील २ पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना

पुणे : बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीवर आधारित गुंतवणुक योजनेत गेन बिटकॉईन देऊन फसवणूक करणाऱ्या  मुख्य सुत्रधार अमित भारद्वाजच्या भारतात पाच कंपन्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. भारताबाहेर हॉंगकाँग, दुबईतील एकूण तीन कंपन्यांमध्ये त्याने मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक केल्याचे उघड झाले आहे़. याप्रकरणात आतापर्यंत एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १५ कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहे़. गेनबिटकॉईन मधील फसवणुकीची व्यापी लक्षात घेऊन सायबर सेलकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे़. या विशेष तपास पथकाने अमित भारद्वाजच्या भारतातील पाच कंपन्या असल्याचे निष्पन्न केले आहे़. त्यात एक्सनेए फॅसिलीटी मॅनेजमेंट प्रा़ लि़ , मायनर्स इंंडिया टेक्नोलॉजीज प्रा़ लि़ , नॉट्रॉन सेल्स प्रा़ लि़, रेडॉक्स इन्फोटेक प्रा़ लि़ , हॅन्स क्लाऊडिंग आयटी एलएलपी़, सॅबटेक्स सर्व्हिसेस (इंडिया) प्रा़ लि़, ग्रॅड वेडिंग सोल्युशन्स लि़ यांचा समावेश आहे़. याशिवाय भारताबाहेर अमेज मायनर्स प्रा़ लि़ हॉगकॉग, एबीसी मेगा अलाईन्स, दुबई, एबी फासिलिटी मॅनेजमेंट, दुबई या कंपन्यांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़. मात्र, त्याने आपला सर्व्हर नेमका कोठे ठेवला आहे़ याची माहिती तो पोलिसांना लागू देत नाही़.अमित भारद्वाज याने गेनबिटकॉईन डॉट कॉम, गेनबिटकॉईन डॉट कॉम ही वेबसाईट तयार केली असून त्याद्वारे गुंतवणुक केलेल्याचे त्यावर रजिस्ट्रेशन करुन त्यांचे युजर आयडीवर आभासी बिटकॉईनचा परतावा मिळाला असल्याचे भासवत असत़. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर त्याने बिटकॉईन फसवणूक करुन त्याच्या कंपनीचे आयडीवर घेतलेले आहेत़. ही वेबसाइट भारद्वाजने बंद करुन फसवणूक केली आहे़. सध्या मुख्य आरोपींपैकी ५ आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडे तपास सुरु आहे़. यातील भारद्वाज याचे वडील व अन्य प्रमुख आरोपी फरार असून त्यांच्या शोधाकरिता सायबर विभागाकडील २ पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत़. याचा लाभ झाला असलेले प्रमुख फरार आरोपी हे दुबई येथे असल्याचे समजते़. त्यांच्याविरुद्ध न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट व लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे़.विशेष तपास पथकाने गेन बिटकॉईन गैरव्यवहारामधील गुन्ह्याचे तपासात नागरिकांना गेनबिटकॉईन एमएलएममध्ये गुंतवणुक करण्यास उद्युक्त करणाऱ्यांना आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे़ या आरोपींकडून २३७ बिटकॉईन, ९० इथेरियम व ३८़९३ लाख रुपये डी़ डी़ स्वरुपात असे एकूण अंदाजे १ कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहेत़ सायबर क्राईम सेल येथे आतापर्यंत ७३ साक्षीदारांची अंदाजे ७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत़ गेनबिटकॉईन या कंपनीमार्फत कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी सायबर क्राईम सेल येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले आहे़ 

टॅग्स :PuneपुणेBitcoinबिटकॉइनCrimeगुन्हाPoliceपोलिस