अदृश्य चलनात कोट्यवधींची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:21 AM2018-04-08T00:21:21+5:302018-04-08T00:21:21+5:30

व्हर्च्युअल, क्रिप्टो करन्सी या अदृश्य चलनाच्या मायाजालात बिटकॉईन खरेदी केलेल्या नांदेडात ८० टक्के गुंतवणूकदारांचे गेन बिटकॉईनच्या अमित भारद्वाजमुळे हात पोळले आहेत़ परंतु बिटकॉईनसोबतच इथेरियम, लेट कॉईन, रिप्पल यासारख्या इतरही अदृश्य चलनामध्ये नांदेडकरांनी शेकडो कोटी रुपये गुंतविले असल्याची बाब समोर आली आहे़ यावरुन अदृश्य चलनाच्या मायाजालाची व्याप्ती लक्षात येते़

Involvement of billions of dollars in invisible currency | अदृश्य चलनात कोट्यवधींची गुंतवणूक

अदृश्य चलनात कोट्यवधींची गुंतवणूक

Next
ठळक मुद्देबिटकॉईन : नांदेडातील मोजक्याच गुंतवणूकदारांचा झाला फायदा

शिवराज बिचेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : व्हर्च्युअल, क्रिप्टो करन्सी या अदृश्य चलनाच्या मायाजालात बिटकॉईन खरेदी केलेल्या नांदेडात ८० टक्के गुंतवणूकदारांचे गेन बिटकॉईनच्या अमित भारद्वाजमुळे हात पोळले आहेत़ परंतु बिटकॉईनसोबतच इथेरियम, लेट कॉईन, रिप्पल यासारख्या इतरही अदृश्य चलनामध्ये नांदेडकरांनी शेकडो कोटी रुपये गुंतविले असल्याची बाब समोर आली आहे़ यावरुन अदृश्य चलनाच्या मायाजालाची व्याप्ती लक्षात येते़
गेन बिटकॉईनचा निर्माता अमित भारद्वाज याला नांदेडातील नेमक्या किती जणांनी बिटकॉईन खरेदी केले याची खडान्खडा माहिती होती़ त्या माहितीच्या आधारेच त्याने बिटकॉईनमधील गुंतवणूकदारांशी संपर्क साधला़ बिटकॉईन खरेदी करणाऱ्या नांदेडातील जवळपास ८० टक्के गुंतवणूकदारांनी आपले बिटकॉईन भारद्वाजला दिले हे विशेष़ त्यामुळे उर्वरित केवळ २० टक्के गुंतवणूकदारांनाच बिटकॉईनच्या खरेदी-विक्रीतून लाभ झाला़ परंतु एकट्या बिटकॉईनच नाही तर इतरही अदृश्य चलनात नांदेडकरांनी आपला पैसा गुंतविला आहे़ त्यामधील इथेरियमचा शनिवारचा दर हा २२ हजार रुपये, लेट कॉईनचा ७ हजार रुपये, रिप्पलचा ३८ हजार १०० रुपये तर बिटकॉईन कॅशचा ३६ हजार रुपये दर होता़ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडीनुसार या दरात वाढ किंवा घट होते़ पोलोनिक्स या साईटवर गेल्यानंतर त्यावर जगभरातील क्रिप्टो किंवा व्हर्च्युअल करन्सीची माहिती असते़ त्यावर खाते उघडल्यानंतर जगभरातील अशा प्रकारच्या कोणत्याही अदृश्य चलनाची खरेदी किंवा विक्री करता येते़ एका दिवसात किंवा काही तासांत या चलनाच्या दरात लाखांनी वाढ किंवा घट होवू शकते़ त्यामुळे झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकजण या अदृश्य चलनाच्या मायाजालात अडकतात़ यामधील गुंतवणुकीवर कुणाचेही निर्बंध नसल्यामुळे काळा पैसा गुंतविण्याचे ते मुख्य केंद्र असल्याचेही दिसून येत आहे़

खरेदी-विक्री सुलभ
बिटकॉईनची खरेदी ही ‘झेब पे’ वर खाते उघडल्यानंतर केली जाते़ त्याच ठिकाणी त्याच्या विक्रीसाठीही आॅप्शन असते़ ‘सेल’ वर क्लिक करताच तो विक्री होतो़ त्यानंतर झेब पे च्या खात्यात विक्रीतून आलेली रक्कम जमा होते़ ही रक्कम गुंतवणूकदाराला बँक खात्यातही वळती करता येते़
गेन बिटकॉईनचा निर्माता अमित भारद्वाज याला पुणे पोलिसांनी दिल्ली येथे अटक केल्यानंतर दिवसभर बिटकॉईनच्या दरात मोठी घसरण झाली होती़ त्यानंतर मात्र गेल्या दोन दिवसांपासून बिटकॉईनचे दर वाढत आहेत़ शनिवारी बिटकॉईन चार लाखांवर पोहोचला होता़

Web Title: Involvement of billions of dollars in invisible currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.