MPSC: पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या अमर मोहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 04:49 PM2022-01-15T16:49:04+5:302022-01-15T17:45:37+5:30

अमर मोहिते हा मुळचा सांगली जिल्ह्यातील होता

amar mohite commits suicide preparing for mpsc exam in pune | MPSC: पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या अमर मोहितेची आत्महत्या

MPSC: पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या अमर मोहितेची आत्महत्या

googlenewsNext

पुणे: राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची (mpsc) तयारी करणाऱ्या अमर मोहिते (वय ३३) या विद्यार्थ्यांना पुण्यातील सदाशिव पेठेत विषप्राशन करत आत्महत्या केली. अमर पीएसआयच्या शारीरिक परीक्षेतून बाहेर पडला होता. तेव्हापासून तो नैराश्यात होता, असं त्याच्या काही मित्रांनी सांगितले. अमरने आज सकाळी सदाशिव पेठेतील वसतिगृहात विष घेऊन आत्महत्या केली. 

अमर मोहिते हा मुळचा सांगली जिल्ह्यातील होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तो पुणे शहरात आला होता. सदाशिव पेठेतील एका वसतीगृहात तो राहात होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या पीएसआयच्या फिजिकल परीक्षेतून तो बाहेर पडला होता. तेव्हापासून  त्याला नैराश्य आले होते. त्यातच कोरोना काळात अनेकदा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे तो आणखी नैराश्यात गेला होता. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. 

दरम्यान यापूर्वीही पुण्यात स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. स्वप्निल हा देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. परंतु सातत्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने जीवन संपवलं होतं. तेव्हा संपूर्ण राज्यातुन सरकार वर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.  त्यानंतर आज पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

Web Title: amar mohite commits suicide preparing for mpsc exam in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.