पुणेकरांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच मेट्रोही लवकरच सुरु करणार; अजित पवारांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 18:38 IST2021-08-29T18:37:59+5:302021-08-29T18:38:07+5:30
पुण्यातील मंगळवार पेठेत सदानंद शेट्टी यांच्या सदा आनंदनगर प्रकल्पाअंतर्गत १३० घरांचे चावी वाटपाच्या लोकार्पण सोहळा

पुणेकरांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच मेट्रोही लवकरच सुरु करणार; अजित पवारांचा विश्वास
पुणे : पुण्याचा विस्तार झाल्यापासून प्रशासन विकासाच्या दृष्टीने पाऊल उचलू लागले आहे. शहर आणि ग्रामीण भागात नवीन इमारतींची उभारणी केली जात आहे. रस्ते, वाहतुकीबाबतही मार्ग काढण्याच्या प्रयत्नात प्रशासन काम करत आहे. त्या सर्व अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे प्रश्न सोडवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
पवार म्हणाले, पुणेकरांना आता व्यवस्थित पाणी मिळालं पाहिजे. मेट्रोचा प्रश्न लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल त्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच विकासकामं व्यवस्थित व्हावीत याच्याशी माझाही प्रयत्न सुरु आहे. पुण्यातील मंगळवार पेठेत सदानंद शेट्टी यांच्या सदा आनंदनगर प्रकल्पाअंतर्गत १३० घरांचे चावी वाटपाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
''रिंगरोडच्या प्रश्नांबाबत शेतकऱ्यांचा विरोध दिसून येत आहे. गावागावात अन्नदात्याकडून आंदोलने केली जातं आहेत. त्याबाबत बोलताना अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रिंगरोडचा प्रश्नांवर मार्ग काढायला लागणार आहे. पण त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे जमिनी जाणार असल्याचं ते म्हणाले आहेत.''
ज्या नागरिकांना येथे घरं मिळाली त्यांनी विकण्याच्या भानगडीत पडू नका
''सदा आनंदनगर योजनेमुळे सदानंद शेट्टी यांच्यावरचा लोकांचा विश्वास अजून वाढला आहे. लोकांना मूलभूत गरजा मिळणं जास्त गरजेचं असतं. आता या घरांमध्ये च्यवस्थित रहा, चांगल्या सवयी लावून घ्या, मुलंबाळं कसे नीट राहतील त्याकडे लक्ष द्या. ज्यांना ज्यांना हे घर मिळणार आहे, ते घर विकण्याच्या भानगडीत पडू नका. जर हे झालं तर राज्यकर्त्यांना असं वाटू शकतं की याना चांगली घरं दिली तर हे लोक घर विकून पुन्हा अडगळीच्या जागी राहायला जातात. असा सल्लाही पवारांनी यावेळी दिलाय.''