राज्यातील सर्वच भोंदूबाबांकडून सामान्यांची फसवणूक; त्यांच्यावर कठोर कारवाई करावी - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:30 IST2026-03-23T12:30:46+5:302026-03-23T12:30:56+5:30

भोंदूगिरी प्रकरणांना आळा घालण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली पाहिजेत, तसेच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावरही कठोर कारवाई करा

All the scammers in the state are deceiving the common people; strict action should be taken against them - Ramdas Athawale | राज्यातील सर्वच भोंदूबाबांकडून सामान्यांची फसवणूक; त्यांच्यावर कठोर कारवाई करावी - रामदास आठवले

राज्यातील सर्वच भोंदूबाबांकडून सामान्यांची फसवणूक; त्यांच्यावर कठोर कारवाई करावी - रामदास आठवले

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी भोंदूबाबा आणि अंधश्रद्धा पसरवणारे लोक सामान्य नागरिकांची फसवणूक करत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली पाहिजेत. तसेच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावरही कठोर कारवाई करावी, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पुण्यात केले.

पुण्यात ‘आरपीआय’तर्फे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आरपीआयचे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, जनरल सेक्रेटरी गौतम सोनवणे, सचिव बाळासाहेब जानराव, उपमहापौर परशुराम वाडेकर, चंद्रकांता सोनाकांबळे, सूर्यकांत वाघमारे, महिपाल वाघमारे, नगरसेवक नीलेश अल्हाट, हिमाली कांबळे, निशा मानवतकर, बसवराज गायकवाड, विशाल शेवाळे, जयदेव रंधवे, नीलेश रोकडे, सचिन मानवतकर, विरेन साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विमान कंपनीवर कारवाई करा

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताची शक्यता आपल्याला वाटत नाही. मात्र, या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, संबंधित विमान कंपनीवर कठोर कारवाई व्हावी, अशीच आपलीदेखील मागणी असल्याचे आठवले यांनी सांगितले.

Web Title : रामदास अठावले ने धोखेबाज बाबाओं के खिलाफ कार्रवाई की मांग की।

Web Summary : मंत्री रामदास अठावले ने महाराष्ट्र में धोखाधड़ी करने वाले बाबाओं और अंधविश्वास फैलाने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई का आह्वान किया, खासकर स्वघोषित बाबा अशोक खरात के खिलाफ। उन्होंने अजित पवार के विमान हादसे की गहन जांच की भी वकालत की और शामिल एयरलाइन के खिलाफ कार्रवाई का आग्रह किया।

Web Title : Ramdas Athawale demands action against fraudulent godmen exploiting common people.

Web Summary : Minister Ramdas Athawale calls for strict action against fraudulent godmen and those spreading superstition in Maharashtra, particularly against self-proclaimed godman Ashok Kharat. He also advocated for a thorough investigation into Ajit Pawar's plane accident, urging action against the involved airline.