शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला लुटणाऱ्या चौघांना सक्तमजुरी

By admin | Updated: February 18, 2017 02:39 IST

भाचीच्या लग्नाचा कार्यक्रम उरकून कऱ्हाडवरून मुंबईकडे निघालेल्या मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यास लिफ्ट दिली. गाडीत बसल्यानंतर

सासवड : भाचीच्या लग्नाचा कार्यक्रम उरकून कऱ्हाडवरून मुंबईकडे निघालेल्या मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यास लिफ्ट दिली. गाडीत बसल्यानंतर काही वेळाने थोडीशी झोप लागली. याचा गैरफायदा घेऊन थेट चुकीच्या रस्त्याने गाडी नेऊन प्रतिकार करताच मारहाण करून लूटमार केली. रोख रक्कम तसेच इतर वस्तू जबरदस्तीने हिसकावून घेतल्या. पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्द हद्दीत रस्त्यात लुटून सोडून दिले होते. या प्रकरणाचा निकाल लागला असून यातील चौघाही आरोपींना सासवड येथील मुख्य दिवाणी न्यायाधीश व्ही. के. जाधव यांनी तीन वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. याबाबत शंकर संभाजी चव्हाण, रा. तडवळे, ता. आटपाडी, जि. सांगली या मुंबई दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने याबाबत फिर्याद दिली होती. तर आरोपी विशाल दिलीप मोरे (वय २४), अरुण हरी राठोड (वय २२), अक्षय गजानन भुजबळ (वय २३), तिघेही रा. शिक्रापूर, ता. शिरूर आणि सोमनाथ विठ्ठल कांचन, (वय २४, रा. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. गाडी खाचखळग्यातून जात असल्याचे लक्षात आल्याने त्यांना जाग आली. तसेच त्यांनी याबाबत विचारणा केली असता मित्राकडे जात असल्याचे सांगितले. मात्र फिर्यादीला शंका आल्याने त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना आरोपींनी मारहाण केली. त्यामुळे त्यांचा प्रतिकार तोकडा पडला. आरोपींनी फिर्यादी शंकर चव्हाण यांच्या हातातील मनगटी घड्याळ, रोख रक्कम, मिक्सर असा सुमारे ७०० रुपयांचा ऐवज तसेच एटीएम कार्ड व इतर कागदपत्रे, ओळखपत्र जबरदस्तीने लुटून त्या दोघांनाही रस्त्यात सोडून दिले. दरम्यान त्यांना संबंधित परिसर ओळखीचा वाटला नाही. त्यामुळे त्यांनी रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना माहिती विचारली असता पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्दच्या हद्दीत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सासवड येथे येऊन याबाबत सविस्तर फिर्याद नोंदविली.या प्रकरणी फिर्याद दाखल करून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड यांच्या मार्गदर्शनाखालीसासवड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नारायण गीते यांनी तपास करून या प्रकरणातील चारही आरोपींना अटक केली. त्यानंतर सासवड येथील दिवाणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील डी. ए. वाकणकर यांनी फिर्यादीच्या वतीने काम पहिले. या प्रकरणी दिवाणी न्यायाधीश व्ही. के. जाधव यांनी आरोपीना प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी, दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली. दि. १५ मे २०१५ रोजी फिर्यादी शंकर चव्हाण हे त्यांचे सहकारी सुरेंद्र बाबू गाडे हे त्यांच्या भाचीचे लग्न उरकून मुंबई येथे ड्युटीवर हजर होण्यासाठी कऱ्हाडमार्गे मुंबईकडे निघाले होते. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीने त्यांना लिफ्ट दिली. गाडीमध्ये चालक व शेजारी एक व्यक्ती बसली होती. तसेच पाठीमागे आणखी एक व्यक्ती बसली होती. काही अंतरावर गाडी गेल्यानंतर फिर्यादी व त्याच्या मित्रास गाडीत झोप लागली. त्यामुळे काही लक्षात आले नाही.