शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत कच-याची पूजा

By admin | Updated: January 28, 2015 23:45 IST

आळंदीतील पद्मावती रस्ता येथील कचरा न उचलल्याने नगरसेवकांनी कचऱ्याची पूजा करून अनोखे आंदोलन करीत मुख्याधिका-यांचा निषेध केला.

आळंदी : आळंदीतील पद्मावती रस्ता येथील कचरा न उचलल्याने नगरसेवकांनी कचऱ्याची पूजा करून अनोखे आंदोलन करीत मुख्याधिका-यांचा निषेध केला. झोपडपट्टी जवळील कचरा कार्तिकी यात्रा संपून दोन महिने होऊनही उचलला जात नाही त्यामुळे आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक राहुल चिताळकर पाटील आणि नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे यांनी पुढाकर घेऊन कचऱ्याची पूजा केली.या वेळी उपनगराध्यक्षा अंजनाताई कुऱ्हाडे ,विरोधी पक्षनेते डि.डि.भोसले ,नगरसेविका वर्षाताई कोद्रे ,माधवी चोरडिया, मनीषा वडगावकर, प्रतिभा गोगावले ,नगरसेवक सचिन पाचंूदे ,राजेंद्र गिलबिले ,मृदूल भोसले पा. ,अशोक कांबळे, गोविंद गोरे, पांडूरंग महाराज शितोळे, सुनिल रानवडे ,कृष्णा मांजरे ,संदिप कुलकर्णी ,अमित आंद्रे ,हर्षल दौंडकर, वेदमूर्ती प्रसाद जोशी यांनी मंत्रपठन करून पूजा केली स्थानिक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.या वेळी नगरसेवक चिताळकर पाटील म्हणाले ‘‘की पद्मावती रोड वरील हा कचरा स्थानिक नागरिकांनी वेळोवळी प्रशासनाला सांगूनही मुख्याधिकारी विनायक औंधकर या भागावर जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. याभागात दोन इंग्लिश मीडियम स्कूल असून, पद्मावती मातेच्या दर्शनाला जात असताना या घाणीतून जावे लागत आहे. या वेळी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे म्हणाले, की आळंदीतील भाजीबाजार, कचरा, रस्ता, पाणी या मुख्य प्रश्नाबाबत आम्ही वेळोवेळी मुख्याधिकारी औंधकर यांच्याकडे समस्यांचा पाढा वाचला आहे. मात्र, ते त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. विरोधी पक्षनेते भोसले पाटील म्हणाले, की आळंदीतील कचऱ्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून सुध्दा कचऱ्याचा प्रश्न सुटत नाही लोकांच्या आरोग्याची जबाबदारी आळंदी नगरपरिषदेची असून, त्यांचे लोकप्रतिनिधी असल्याची आम्हाला लाज वाटते. लोकांचे प्रश्न सुटत नसतील, तर आम्ही राजीनामा द्यायला मागे पुढे पाहणार नाही. आळंदीत नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात समतोल नसल्याने आळंदीचा विकास खुंटला आहे. (वार्ताहर)