शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोन्याला झळाळी; सराफी बाजारात सोने खरेदीसाठी उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 11:58 IST

Akshaya Tritiya 2026 - जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती, राजकीय अस्थिरता आणि रुपयाच्या घसरणीमुळे बाजार कडाडला आहे.

पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचा मुहूर्त शुभ मानला जातो. या मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास सोने अधिकाधिक वृद्धिगंत होते अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात कितीही चढउतार झाले तरी मुहूर्ताच्या सणासुदीला मध्यमवर्गीयांकडून सोने खरेदी हमखास केली जाते.

यंदाची अक्षय तृतीयादेखील त्याला अपवाद ठरलेली नाही. शनिवारी (दि. १८) अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या किमतीने दीड लाखाचा टप्पा गाठला असतानाही शहरातील लक्ष्मी रोड, सोन्या मारुती चौक अशा विविध भागांतील सराफा दुकानांमध्ये दिवसभर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली, त्यामुळे सराफी व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती, राजकीय अस्थिरता आणि रुपयाच्या घसरणीमुळे बाजार कडाडला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. गतवर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरात सुमारे ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरीही ग्राहकांचा खरेदीकडे कल कायम असल्याचे दिसून येत आहे. आपल्या बजेटनुसार उदा; १ लाखाचे बजेट असल्यास ८ ते ९ ग्रॅमचे सोने खरेदी करण्याला ग्राहक प्राधान्य देत आहेत.

वेढणी, कॉईन यांना मागणी अधिक आहे तर चांदीचे बिस्कीट आणि कॉईन यांना मागणी वाढली असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले. सोन्याचे दर गगनाला भिडल्याने ग्राहकांनी जड दागिन्यांऐजी 'लाइटवेट' (हलक्या वजनाचे) आणि डिझायनर दागिन्यांना अधिक पसंती दिली आहे. विशेषतः १८ कॅरेटमधील नाजूक नेकलेस, ब्रेसलेट आणि कानातल्यांची मागणी वाढली असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी (दि. १९) अक्षय तृतीया आली असल्याने सुट्टीचा दिवस साधत सोन्याच्या खरेदीने सराफा बाजाराला अधिक झळाळी मिळण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.  

सोन्याचा भाव (दि. १६ एप्रिल)

२४ कॅरेट : १५,३५२ रुपये - प्रतिग्रॅम

२२ कॅरेट : १४,१३८ रुपये - प्रतिग्रॅम

चांदी (किलो) २ लाख ५७ हजार ५०० रुपये

साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचा मुहूर्त असतो. त्यामुळे त्याच दिवशी सोने खरेदीला ग्राहक प्राधान्य देतात. सोन्याच्या भावात वाढ झाली असली तरी खरेदीवर कोणताही परिणाम होणार नाही. अक्षय तृतीयेला चांगली खरेदी होईल. - अभय गाडगीळ, संचालक, पीएनजी एक्सलुसिव्ह, नळस्टॉप  

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुवर्ण खरेदीचा शुभमुहूर्त मानल्या जाणाऱ्या या सणानिमित्त ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याची अपेक्षा यावर्षी आहे. दरात चढ-उतार असूनही सोन्याबाबतचा विश्वास कायम असून, चंदुकाका सराफ यांनी विविध आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. लग्नसराईच्या हंगामामुळे विक्रीत चांगली वाढ होईल, असा आमचा अंदाज आहे. परिणामी बाजारात तेजीचे संकेत दिसून येत आहेत. - सम्यक किशोरकुमार शह, मॅनेजिंग डायरेक्टर चंदुकाका सराफ इराण व इस्रायल युद्धामुळे सोन्याच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहक प्लॅनिंगनुसार सोने खरेदी करण्यावर भर देत आहेत. एखादा चार ते पाच लाखांचा दागिना घ्यायचा असेल तर डिझाइन निवडतात, बुक करून पेमेंट करतात आणि मग सणाच्या दिवशी घेऊन जातात. गेल्या आठ ते दिवसांत हे चित्र पाहायला मिळत आहे. अक्षय तृतीयेसाठी वेढणीला मागणी आहे. - अतुल अष्टेकर, संचालक के. आर अष्टेकर ज्वेलर्स

English
हिंदी सारांश
Web Title : Akshaya Tritiya 2026: Gold sparkles; enthusiasm for buying gold in market.

Web Summary : Akshaya Tritiya sees gold prices surge, yet customers throng Pune's jewelry stores. Despite rates hitting record highs, purchasing remains strong. Lightweight, designer jewelry are preferred. Jewelers anticipate a sales boost over the holiday weekend.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAkshaya Tritiyaअक्षय्य तृतीया