शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादा, एकवेळ तुम्ही कृषिमंत्री व्हा,पण त्यांचा राजीनामा घ्या;रोहित पवारांचा कोकाटेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 16:08 IST

- आमदाराच्या बंधूनी त्या ठिकाणी गोळीबार केला त्यात एका महिलेला इजा पोहोचली आहे, पोलीस जर माहिती दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर योग्य ठरणार नाही

पुणे शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न सुटण्याऐवजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या व्हिडिओवर टीका करत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.तर आज पुण्यात माध्यमांशी बोलतांना रोहित पवार म्हणाले, गेले काही महिने कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या विरोधातच बोलत आहेत. तुम्ही कुठेही रमी खेळा, पण कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही जबाबदारी आहे. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत अहंकाराने बोलताय, शेतकऱ्यांना भिकारी म्हणताय, हा अहंकार बाजूला ठेवून बोला. जर असं वर्तन सुरूच राहिलं तर राजीनामा द्यावा लागेल.पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, 'अजितदादांना सांगायचं आहे की कृषिमंत्री बदला, एक वेळ तुम्हीच कृषिमंत्री व्हा, पण कोकाटेंचा राजीनामा घ्या, अजितदादांवर यापूर्वी खोटे आरोप झाले होते, तेव्हाही त्यांनी राजीनामा दिला होता आणि कराडला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीजवळ बसले होते. आता तुम्ही पक्षाचे प्रमुख आहात, मग तुमचे मंत्री जर अशा पद्धतीने वागत असतील तर याचा अर्थ तुमच्या मंत्र्यांवर तुमचा कंट्रोल नाही असं म्हणायचं का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.यावेळी दौंडच्या कलाकेंद्र गोळीबार प्रकरणावरही रोहित पवार यांनी भाष्य केले. एका आमदाराच्या भावाने गोळीबार करून एका महिलेला इजा पोहोचवली आहे. जर पोलीस माहिती दडपून ठेवत असतील तर योग्य नाही. उद्या या गोष्टी खर्‍या ठरल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी लागेल. सत्ताधाऱ्यांचा दबाव आणि पीडितेवर दबाव टाकला जात आहे, असा गंभीर आरोप पवार यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारManikrao Kokateमाणिकराव कोकाटेAgriculture Sectorशेती क्षेत्र