पुरंदर तालुक्यातील ढगफुटीनंतर उद्भवलेल्या पूरस्थितीबाबत अजित पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 16:15 IST2019-09-26T16:02:43+5:302019-09-26T16:15:45+5:30
आचारसंहिता असताना पिण्याचे पाणी,अतिवृष्टी ,गारपीट, भुकंप झाल्यास त्याला मदतीसाठी आचारसंहिता आड येत नाही..

पुरंदर तालुक्यातील ढगफुटीनंतर उद्भवलेल्या पूरस्थितीबाबत अजित पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
बारामती : पुरंदर तालुक्यातील ढगफुटीनंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्यांना बारामतीच्या पुरस्थितीबाबत माहिती दिली. बारामती येथे खुद्द पवार यांनीच पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली.पवार यांनी तत्पुर्वी शहरातील पुरग्रस्तांची भेट घेवुन चर्चा केली.पुरग्रस्तांना पुरविण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती घेतली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, नुकतीच मुख्यमंत्र्यांशी पुरस्थितीबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्यांना याबाबत रिपोर्ट करण्यात आला आहे.पुरग्रस्तांना मदतीसाठी आचारसंहितेची अडचण येवु नये,यासाठी
त्यांना विनंती करण्यात आली आहे. आचारसंहिता असताना पिण्याचे पाणी,अतिवृष्टी ,गारपीट, भुकंप झाल्यास त्याला मदतीसाठी आचारसंहिता आड येत नाही ,असे पवार म्हणाले. शहरात जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक थांबुन आहेत.शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
——————————————
...धरणाच्या इतिहासात प्रथमच मोठा पाऊस
बुधवारी(दि २५) रात्री १० ते ११ च्या दरम्यान, पुरंधर ताुलक्यातली गराडे येथे ढगफुटी झाली.यावेळी साडेंचार ते पावणे पाच इंच ऐवढा प्रचंडपाऊस एक तासात पडला. मधल्या काळात गराडे आणि इतर धरणे भरली गेलेलीहोती. रात्री सगळ्या पावसाचे नदीच्या कऱ्हा पात्रात उतरले.कऱ्हा नदीतीलपाणी शेवटी पाणी नाझरेमध्ये आले.त्यामुळे वरुन येणारे पाणी ८५ हजार क्युसेक्सचे झाले.
———————————
... उजनीतील १ लाख क्युसेक्स विसर्ग
कऱ्हा आणि निराचा संगम सोनगाव परिसरात होतो.त्या ठिकाणी देखील दिवसा पाणी वाढेल,रात्री पाणी कमी होईल. नाझरेचे पाणी जवळपास १० ते १२ हजारक्युसेक्स ने सुरु आहे.ते देखील लवकरच बंद होईल. तसेच, निरेचे पाणी आता बंद होईल.पुणे शहरातील पाणी उजनीमध्ये सोडले जाते.दौंड मार्गे ते पाणी उजनी जलाशयात पोहचण्यासाठीआवश्यक कालावधी गृहित धरुन उजनीतील पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.आज सकाळी उजनीतील १ लाख क्युसेक्स विसर्ग आहे.त्यामुळे पुण्यातील पाणी उजनी पात्रात आल्यानंतर देखील काळजी करण्याचे कारण नाही,असे अजित पवार यांनी सांगितले.
——————————————————