शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या रस्ते रुंदीकरण ठरावाची अजित पवारांकडून गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 12:29 IST

रस्त्यांचे रूंदीकरण ठराव पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला आहे.. 

ठळक मुद्देमंगळवारी मुंबईत बैठक: पालिकेला आवश्यकता पटवून द्यावी लागणार

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने केलेल्या शहरातील रस्त्यांच्या रूंदीकरण ठरावाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. मंगळवारी ( दि.१५) त्यांनी यासंदर्भात नगरविकास खात्याच्या सचिवांसोबत पालिका आयुक्त व महापौर यांची संयुक्त बैठक बोलावली आहे. यात या ठरावाच्या आवश्यकतेबाबत पालिकेला त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. आधी शहरातील ९ मीटरचे ३२३ व नंतर ऊपसुचनेसह ६ मीटरच्या रस्त्यांचेही रूंदीकरण करण्याचा हा ठराव पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने स्थायी समितीत बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला आहे. उपमुख्यमंत्री पवार शुक्रवारी दिवसभर पुण्यात होते. त्यांच्याकडे या ठरावाच्या विरोधात आधीच तक्रारी झाल्या आहेत. तो त्यानंतरही मंजूर झाल्यावर माजी महापौर प्रशांत जगताप यांनी ठरावच बेकायदा असल्याची टीका केली. पवार यांच्याकडे त्यांनीच यासंबधीची सर्व माहिती देत यात लक्ष घालावे अशी विनंती केली होती. शुक्रवारच्या पवार यांच्या दौर्यात जगताप यांच्यासह आणखी काही जणांनी पवार यांची भेट घेत या ठरावाबाबत तक्रारी केल्या.त्याची दखल घेत पवार यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. बहुमताच्या जोरावर कोणतेही निर्णय लादू नका अशी जाहीर तंबी देत पवार यांनी दिली होती. आयुक्त शेखर गायकवाड, महापौर मुरलीधर मोहोळ यांना त्यांनी मोजकेच रस्ते का व कशासाठी असा सवालही केला होता. आता पालिकेला या ठरावासंबधीची गरज बैठकीत पटवून द्यावी लागणार आहे.नगरविकास खात्याचे सचिव व अन्य वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला ऊपस्थित असतील. त्यांच्याकडून.पवार हा ठराव तपासून घेण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस