Ajit Pawar: रात्री दोनला अजितदादांचा फोन खणाणला अन् अपघातग्रस्त तरूणांचे प्राण वाचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 15:07 IST2023-07-09T15:06:07+5:302023-07-09T15:07:15+5:30
अजित पवारांना देवगिरी बंगाल्यावर अपघाताची माहिती मिळताच झोपेतून उठत तातडीने अपघातग्रस्तांना मदत पोचविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले

Ajit Pawar: रात्री दोनला अजितदादांचा फोन खणाणला अन् अपघातग्रस्त तरूणांचे प्राण वाचले
बारामती : रात्री दोन वाजता ‘देवगिरी’मधून फोन खणाणला आणि अजितदादांची मदत अपघातग्रस्तांपर्यंत पोहचली. या मदतीमुळे अपघातग्रस्त सात युवकांचे प्राण वाचले. शनिवारी (दि. ८) पहाटे १ च्या सुमारास पोलादपूर घाटामध्ये पाठीमागून भरधाव येणाºया टँकरने बारामतीच्या या दोन्ही चारचाकींना जोरदार ठोकर देत चिरडले. यात एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर सात जण बचावले आहेत. ही घटना ऐवढी भयंकर होती, की बचावलेल्या युवकांना रात्रीच्यावेळी काय करावे ते सूचत नव्हते.
या अपघातामध्ये दत्तात्रेय शरद टेके ( वय ४३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. टेके हे माळेगाव येथील रहिवासी होता. याबाबत अधिक माहिती आहे अशी की, बारामती हून आठ युवक गोव्याला फिरण्यासाठी निघाले होते. मात्र पोलादपूर येथे एका वाहनाने दोन्ही गाड्यांना जोरात धडक दिली. यात सातजण बचावले आणि एकाचा मृत्यू झाला. मात्र एवढ्या रात्रीच्या वेळी मदत पोहचवणे अवघड होते. त्यावेळी त्यातील एकाने माळेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रविराज तावरे यांना मोबाईलद्वारे संपर्क केला व झालेल्या दुर्घटनेची माहिती देत मदतीची मागणी केली. त्यानुसार तावरे यांनीही रात्री दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगाल्यावर अपघाताची माहिती कळविली. त्यानुसार पवार यांनीही झोपेतून उठत तातडीने बारामतीच्या अपघातग्रस्तांना मदत पोचविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले. त्यामुळे तात्काळ यंत्रणांची मदत तरुणांपर्यंत पोहचली. मात्र तातडीची मदत मिळेपर्यंत माळेगावचा दत्तात्रेय टेके हा युवक मयत झाला होता, तर सात जण बचावल्याची माहिती पहाटेपासून संबंधित अधिकाºयांच्या संपर्कात असलेल्या पवार यांना देण्यात आली. किरकोळ जखमी झालेल्या व बचावलेल्या सात युवकांना पुढील वैद्यकिय उपचारासाठी सूचना केल्या. या घटनेतून अजित पवार यांचा संवेदनशीलपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.