पुणे : महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी खचून न जाता पक्ष संघटना अधिक मजबूत करून पुन्हा भरारी घेण्याचा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला होता, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी दिली.
टिंगरे म्हणाले, महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अजित पवार पुण्यात ठाण मांडून होते. पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. उमेदवार निवडीपासून प्रचाराच्या रणनीतीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वैयक्तिक लक्ष घातले होते. निवडणूक काळात आम्ही सर्वजण त्यांच्या सतत संपर्कात होतो आणि महापालिकेत सत्ता मिळेल, अशी त्यांनाही पूर्ण खात्री होती.
पुढे बोलताना टिंगरे यांनी सांगितले की, मागील आठवड्यात अजित पवार यांची शेवटची भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीत पक्षाचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई निश्चितपणे करू, तसेच संघटना अधिक मजबूत करून पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याचा निर्धार व्यक्त केला होता. महापालिकेतील गटनेतेपदासह पक्षाच्या पुढील वाटचालीबाबतही त्यावेळी सविस्तर चर्चा झाली होती. पराभव हा कायमचा नसतो; योग्य नियोजन, संघटनात्मक बळ आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा आत्मविश्वास अजित पवार यांनी आम्हा सर्वांना दिला होता, असेही टिंगरे यांनी नमूद केले.
Web Summary : Despite election setbacks, Ajit Pawar expressed confidence in the party's recovery. Pune city president Sunil Tingre relayed Pawar's determination to strengthen the organization and work with renewed vigor. Pawar emphasized that defeat isn't permanent, and the party will rise again with planning and hard work.
Web Summary : चुनाव में असफलताओं के बावजूद, अजित पवार ने पार्टी के सुधार में विश्वास जताया। पुणे शहर के अध्यक्ष सुनील टिंगरे ने संगठन को मजबूत करने और नए उत्साह के साथ काम करने के पवार के दृढ़ संकल्प को दोहराया। पवार ने जोर दिया कि हार स्थायी नहीं है, और पार्टी योजना और कड़ी मेहनत से फिर से उठेगी।