बारामती : गाेजुबावी (ता. बारामती) येथे चार्टर्ड विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी पावणेनऊ वाजता घडली. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे बारामतीच्या इतिहासातील बुधवार हा ‘काळा दिवस’ ठरला आहे. या अपघातात उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह पीएसओ विदिप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला आहे.अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!या अपघातावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी लोकमतशी बोलतांना नेमकं काय घडले यांची सविस्तर माहिती दिली आहे. गोजुबावी गावातील ग्रामस्थ राघू मारोती आटोळे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले,'जनावरांना खायला नेत होतो. ८:४५ ला जोरात आवाज आला. १० किमी आवाज गेला असेल एवढा आवाज होता. जाळ खूप उंच होता. ५० फूट मागेच धूर आणि आगीमुळे आम्हाला थांबावे लागले. विमानाने २ घिरट्या मारल्या. पण दुसऱ्यांदा उतरतानाच ते अनियंत्रित झाल्याचे दिसून येत होते. जोरात विमान हालत होते. असेही राघू मारोती आटोळे यांनी सांगितले.
Web Summary : Baramati mourns after a plane crash killed Deputy CM Ajit Pawar and four others. Eyewitnesses reported the plane circled erratically before a fiery explosion. Villagers described the intense heat and debris, expressing shock and grief over Pawar's tragic death, remembering him as Baramati's pride.
Web Summary : बारामती में विमान दुर्घटना में उपमुख्यमंत्री अजित पवार और चार अन्य की मौत के बाद शोक है। प्रत्यक्षदर्शियों ने बताया कि विमान में आग लगने से पहले वह अनियंत्रित रूप से चक्कर लगा रहा था। ग्रामीणों ने तीव्र गर्मी और मलबे का वर्णन करते हुए पवार की दुखद मौत पर सदमा और दुख व्यक्त किया, उन्हें बारामती का गौरव बताया।