पुणे: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर न्याय मिळाला आहे. राज्य सरकारने मागण्या पूर्ण करत यांच्यासहित महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा दिला आहे. आरक्षण मागण्या पूर्ण झाल्यावर आता विरोधक शांत का बसले आहेत? असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाण साधला आहे.
अजित पवार म्हणाले, आमच्या सोबत प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे सरकारला जनतेला विकास करून द्यायचा आहे. वेगवेगळे प्रसंग उद्भवतात ते शांतपणे सामोपचाऱ्यांनी कसा काढता येईल प्रयत्न केला जातो. मुंबई मध्ये मराठा आरक्षण झालेल्या आंदोलनामध्ये काही जण राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते. कमी संख्या आहे त्यामुळे आपले काही होईल का बघत होते. आता दिले तर आता गप्प गार झाले आहेत. मिडिया मध्ये जाऊन बोलत होते आता दिले तरी चर्चा सुरू आहे.
पुढच्या वर्षी लवकर या
पुण्याच्या भूमीतून छत्रपती शिवाजी सारखा राजा आपल्याला मिळाला. अनेकजण अनेकांना घडवण्याचे काम करत असतात. शिक्षकदिन उद्या आहे माहिती आहे एक दिवस आधी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतोय. राज्यात देशात आणि जगात गणेशोत्सवाच आनंदाने सुरू आहे. जातीय सलोखा ठेवण्याचे काम पोलिस यंत्रणा काम करत असते, मंगलमय वातावरण आहे. गणपती विसर्जन बघता बघता आले, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणावे लागेल.
गावाचा विकास झाला तर देशाचा होईल
पंचायतराज अभियान सुरू झाले आहे. या कार्यशाळा मध्ये अनेकजण सहभागी आहेत ते त्याचे अनुभव सांगतील. आम्ही गेलो तरी कोणी सोडवून जाऊ नका, मी आपला जातो, कोणी सोडवायला येऊ नका. या अभियानाचा उद्देश आहे की, गावागावात विकास करणे. यावेळी मला आर आर पाटील याची आठवण येते. त्यांनी अनेक अभियान राबवले. आर आर पाटील यांनी काम केले त्याचे कौतुक झाले. अनेक गाव स्वच्छ झाली. विकास झाला, यात सातत्ये टिकले पाहिजे. प्रत्येक गाव हे स्वयंपूर्ण झालं पाहिजे स्वावलंबी झालं पाहिजे. आदर्श ग्राम राज्य झालं पाहिजे. गावाचं स्वतःचं अन्नधान्य रोजगार स्वच्छता शिक्षण आणि आरोग्य याबाबतीत स्वावलंबन प्राप्त केलं पाहिजे. हा त्या काळामध्ये महात्मा गांधींनी सांगितलेला विचार आहे. आज त्या गोष्टी आपल्याला किती बारकाईने लक्षात येतात. खेडी सक्षम झाली तर आपला भारत देश आपोआप सक्षम होईल. म्हणूनच त्यांनी ग्रामसभा लोकसहभाग, कुटीर उद्योग महिला सक्षमीकरण आणि सर्वांसाठी न्याय या मूल्यावर आधारलेला ग्रामविकासाचा विचार त्या काळामध्ये मांडला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण भागात लोकशाहीला खऱ्या अर्थाने बळ देण्याचं काम केलं. सत्तेचा विकेंद्रीकरण करण्याचं काम केलं. ग्रामपंचायत ही केवळ व शासकीय यंत्रणा नाही. तर ती लोकशाहीची शाळा आहे. अनेक नेते जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणून पुढे आले आहेत. आम्ही सत्तेत आल्यावर पहिला १०० दिवसाचा कार्यक्रम आणला. आता दीडशे दिवसाचा कार्यक्रम आणला. संजय गांधी निराधार योजना सुरुवात ६० रुपयाने सुरू झाली. कामाचा दर्जा चांगला ठेवा. २५ कोटी झाडे लावण्याचा आमचा मानस आहे. जनतेला सरकारी योजना लाभ मिळाला पाहिजे असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले आहे.