शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

एका 'झुरळा' ने केला दोन प्रवाशांचा विमान प्रवास मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 14:09 IST

विमान प्रवासाची रक्कम परत करण्याचा आदेश :

ठळक मुद्दे मानसिक व शारीरिक त्रासाच्या  भरपाईकरिता ५० हजार द्यावे लागणार

युगंधर ताजणे-  पुणे : विमानाने प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांना आपल्या सीटवर झुरळ आढळल्याने त्यांनी संबंधित विमान कंपनीकडे तक्रार केली. मात्र त्या कंपनीच्या व्यवस्थापन विभागाने प्रवाशाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. यामुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन कराव्या लागणाऱ्या प्रवाशांना ग्राहक मंचाने दिलासा दिला आहे. तसेच इंटरग्लोब एव्हिशन लिमिटेड (इंडिगो)व एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांना दोन्ही तक्रारदारांना विमान प्रवासा ८ हजार ५७४ रुपयांची रक्कम, मानसिक व शाररीक तक्रार खर्चापोटी ५० हजार रुपये देण्याचा आदेश ग्राहक मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य क्षितीजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांच्या मंचाने दिला.  स्कंद असीम बाजपेयी (रा. शीला विहार कॉलनी, कोथरुड), सुरभी राजीव भारद्वाज (रा. वनराजी हाईटस, कोथरुड) यांनी याप्रकरणी ग्राहक मंचाकडे दाद मागितली. तक्रारदार यांनी १ डिसेंबर २०१८ रोजी पुणे ते दिल्लीच्या विमानप्रवासासाठी ८ हजार ७५४ रुपये देऊन इंडिगो या कंपनीचे तिकीट बुक केले. यानंतर ३१ डिसेंबर रोजी तक्रारदार प्रत्यक्षात विमानातून प्रवास करताना त्यांना आपल्या आसनावर झुरळ असल्याचे दिसून आले. त्यांनी ही बाब कंपनीच्या प्रतिनिधीच्या निदर्शनास आणून देत त्यांना तात्काळ स्वच्छता करण्यास सांगितले. मात्र त्यावर त्यांनी तक्रारदारांना आपल्या मोबाईलवर संदेश आणि इमेलव्दारे सविस्तर तक्रार नोंदविण्याची सूचना केली. यानंतर देखील स्वच्छतेविषयी कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. प्रवाशाने तक्रारीबद्द्ल नोंदणी पुस्तिकेची मागणी केली असता ती देण्यास टाळाटाळ केली. दिल्ली येथे विमान पोहचल्यानंंतर तक्रारदारांनी झुरळाचे फोटो कंपनीच्या प्रतिनिधींना दाखवल्यानंतर त्यांनी कारवाई न करता पुन्हा मेलव्दारे तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार १ जानेवारी २०१९ रोजी मेलद्वारे कंपनीकडे तक्रार केली. यावर ४ जानेवारीला कंपनीकडून पेस्ट कंट्रोल व्यवस्थित केले नसल्याने असुविधा झाल्याचे कारण दिले. पुढे कंपनीने झुरळांचा प्रादुर्भाव बंद करता येणार नसल्याचे मेलव्दारे सांगितले. मात्र यासगळयात तक्रारदारांना मोठ्या मानसिक व शाररीक त्रास झाल्याचे त्यांनी मंचाला दिलेल्या अर्जात म्हटले आहे. 

विमान प्रवासा दरम्यान स्वच्छ निर्जतुंक व जबाबदारीने सेवा सुविधा पुरविणेबाबत कंपनीने तक्रारदार यांच्यासमवेत करार केला होता. कंपनीकडून कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात टाळाटाळ करणे ही बाब मंचाकडून विचारात घेतली. तक्रारदार बाजपेयी यांचे हाताचे दुखणे व भारद्वाज यांना संसर्गजन्य आजार असताना देखील त्यांना कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे मानसिक त्रासाला सहन करावा लागला. यासगळयाची संबंधित यंत्रणेकडून दखल घेतली  गेली नाही. 

..............

* जाब देणारे इंडिगो आणि एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी दोन्ही तक्रारदारांना एकत्रितपणे विमान प्रवासाची ८ हजार ५७४ रक्कम तक्रार दाखल दिनांक ३० मार्च २०१९ पासून ९ टक्के व्याजासहित परत करावेत. आदेश प्राप्तझाल्यानंतर तीस दिवसांच्या आत तक्रारदारांना शाररीक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. याची भरपाई म्हणून ५० हजार रुपये एकत्रित देण्याचा आदेश मंचाने दिला आहे. 

* झुरळाचे विमानामध्ये असणे ही गंभीर बाब नसून त्यामुळे तक्रारदारास प्रवासादरम्यान कोणताही त्रास झाला नाही. यामुळे तक्रारदारांची तक्रार गंभीर नाही, असे जाब देणाऱ्या कंपनीकडून सांगण्यात आले. तसेच जाब देणाऱ्यांच्या इमेलची तपासणी केल्यानंतर त्यांनी तक्रारदारास सेवा पुरविताना उदभवलेल्या त्रुटीपूर्ण सेवेची कोणतीही दखल घेतली नाही. हे मुद्दे आदेशात महत्वाचे ठरले. 

टॅग्स :Puneपुणेdelhiदिल्लीPoliceपोलिसairplaneविमानCourtन्यायालय