‘उडाण’मुळे पुणेकरांचा हवाई प्रवास झाला सोपा; पुण्यातून १२ नव्या ठिकाणी सेवा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 16:44 IST2024-12-12T16:44:11+5:302024-12-12T16:44:11+5:30

पुणे विमानतळ १२ नवीन विमानतळाशी जोडण्यात आले आहे.

Air travel has become easy for Pune residents due to 'Udan'; Service started at 12 new locations from Pune | ‘उडाण’मुळे पुणेकरांचा हवाई प्रवास झाला सोपा; पुण्यातून १२ नव्या ठिकाणी सेवा सुरु

‘उडाण’मुळे पुणेकरांचा हवाई प्रवास झाला सोपा; पुण्यातून १२ नव्या ठिकाणी सेवा सुरु

- अंबादास गवंडी
 
पुणे :
उडाण योजनेंतर्गत २०२४ मध्ये पुण्यातून १२ नवीन ठिकाणी विमानसेवा सुरु करण्यात आले. यामुळे विमान प्रवाशांना देशांतर्गत प्रवासाठी सोयीचे झाले असून, यातून वर्षभरात १ हजार १८० विमान उड्डाणे झाले आहेत. त्यातून ६९ हजार ६४६ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

सर्वसामान्यांना विमान प्रवास सोयीचे व्हावा, यासाठी २०१६ मध्ये उडाण ही योजना सुरु करण्यात आली. यामुळे देशांतर्गत विमान सेवा वाढविण्यावर भर देण्यात आली आहे. यामुळे पुणे विमानतळ १२ नवीन विमानतळाशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. परवडणाऱ्या दरात सेवा असल्याने प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मेपासून या योजनेंतर्गत पुण्यातून विमान सेवा सुरु करण्यात आले आहे. यामध्ये भावनगर, सिंधुदुर्ग, नांदेड, जळगाव, किशनघर आणि प्रयागराज या ठिकाणी विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. भविष्यात यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, असे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भावनगरला उदंड प्रतिसाद
पुण्यातून १२ ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या या विमान सेवेत पुणे-भावनगर आणि भावनगर-पुणे याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येल्या वर्षभरात पुणे-भावनगर दरम्यान २३२ उड्डाणे झाले असून, यातून ११ हजार ६३१ प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर भावनगर-पुणे यादरम्यान २२० उड्डाणे झाले असून, यातून ११ हजार ५८८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यानंतर किशनघर, जळगाव, नांदेड या ठिकाणी प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

उडाण या योजनेंतर्गत पुण्यातून १२ ठिकाणी विमाने सुरु करण्यात आली आहे. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-संतोष डोके, विमानतळ संचालक

Web Title: Air travel has become easy for Pune residents due to 'Udan'; Service started at 12 new locations from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.