शहरं
Join us  
Trending Stories
1
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
2
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
3
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
4
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
5
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
6
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
7
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
8
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
9
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
10
विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...
11
आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप
12
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
13
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
14
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
15
कार्तिकी एकादशी २०२५: १ नोव्हेंबरला एकादशी तिथी प्रारंभ; पण उपास नेमका कधी? वाचा अचूक माहिती
16
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
17
₹25,88,50,70,00,000 स्वाहा, मार्क झुकरबर्ग यांनी संपूर्ण वर्षात जेवढं कमावलं, त्याहून अधिक एका दिवसात गमावलं!
18
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
19
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
20
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा

विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी; मदतकार्यासाठी यंत्रणांना बळ मिळो - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:09 IST

विमान कोसळण्याच्या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचं देखील कळतंय, हे अतिशय दुःखद आहे

पुणे : गुजरातच्या अहमदाबादमध्ये सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुर्दैवी अपघात झाला. लंडनला जाणारे प्रवासी विमान विमानतळाजवळच कोसळले. समोर आलेल्या फोटोंमधून विमानाचे तुकडे झाले असल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. अहमदाबाद येथे विमान कोसळून हा अपघात झाला आहे. अहमदाबादमधून या विमान अपघाताचे भयावह फोटो आणि व्हिडीओही समोर येत आहेत. विमान अपघातानंतर अहमदाबादच्या मेघानी परिसरात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत आहे. तसेच दूरवरून काळ्या धुराचे ढग दिसत आहेत. (Air India Ahmedabad Plane Crash) 

सीआयएसएफच्या म्हणण्यानुसार, उड्डाण घेतल्यानंतर, विमान शहरातील एका निवासी भागातील एका इमारतीवर आदळले आणि त्यानंतर त्यात मोठी आग लागली. अपघातानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आहे. या हृदयद्रावक घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल प्रशासनाला  युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य राबवण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्दैवी घटनेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.  

गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचं देखील कळतंय, हे अतिशय दुःखद आहे. अपघातग्रस्त जखमी प्रवाशांवर उपचार करणाऱ्या व घटनास्थळी मदतकार्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना बळ मिळो आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना पवार यांनी केली आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातairplaneविमान