शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे स्मार्ट सिटी कंपनीचे दोन संस्थांशी करार

By admin | Updated: September 22, 2016 01:56 IST

स्मार्ट सिटी योजनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने (पीएससीडीसीएल) दोन संस्थांबरोबर सामंजस्य करार केले.

पुणे : स्मार्ट सिटी योजनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने (पीएससीडीसीएल) दोन संस्थांबरोबर सामंजस्य करार केले. यातील एक संस्था परदेशी असून, या संस्थेमार्फत जगातील विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाची माहिती स्मार्ट सिटी कंपनीला देण्यात येणार आहे. ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया (जीसीएनएल) या संस्थेबरोबरही कंपनीच्या कामाकाजाच्या रचनेसंबधी करार करण्यात आला.युरोपियन बिझनेस अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी सेंटर (ईबीटीसी) असे परदेशी संस्थेचे नाव आहे. युरोपातील सर्व प्रगत स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्रित येऊन हे सेंटर सुरू केले आहे. गेली अनेक वर्षे ते या पद्धतीचे तंत्रज्ञानाची माहिती पुरविण्याचे काम करीत असून, आता त्यांनी त्यासाठी पुणे शहराची निवड केली आहे. जगभरात विविध देशांमध्ये अनेक प्रकारच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी बरेच प्रकल्प सुरू असतात. त्यात वापरलेल्या तंत्रज्ञानाची माहिती या संस्थेच्या वतीने पुणे स्मार्ट सिटी कंपनीला या करारान्वये देण्यात येईल. त्याचबरोबर कोणत्या समस्या सोडवण्यासाठी कोणती उपाययोजना प्रभावी ठरेल, ती कशी वापरायची, याबाबतही सल्ला देण्यात येईल. संस्थेचे प्रतिनिधी पॉल जेन्सन अन्य वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक तथा महापालिका आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, आदी या वेळी उपस्थित होते. संस्थेबरोबर कंपनीने दोन वर्षांचा करार केला आहे. पुण्याबरोबरच उत्तर प्रदेशातील लखनौ शहराबरोबरही त्यांनी करार केला आहे. (प्रतिनिधी)