शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुणे विद्यापीठात ABVP चे आंदोलन; आंदोलनकर्ते आक्रमक, पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 14:43 IST

जोपर्यंत विद्यापीठ कारवाई करत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचा विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा

पुणे : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात मागील काही दिवसात ड्रग्ज संदर्भात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. ललित पाटील या ड्रग्ज तस्करामुळे शहरातील ड्रग्जची समस्या ऐरणीवर आली होती. त्यामुळे एकूणच सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातच गांजा सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्याबाबत आता विविध संघटनांकडून कारवाईची मागणी पुढे येत होती. अशातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठात आंदोलन केले आहे. यावेळी ABVP चे विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 

व्यसनमुक्त विद्यापीठ झालंच पाहिजे, व्यसनमुक्त विद्यापीठ झालंच पाहिजे, भारत माता कि जय अशी घोषणाबाजी करत विद्यार्थी आक्रमक झाले. यावेळी पोलीस आणि abvp च्या विद्यार्थ्यांमध्ये झटापट पाहायला मिळाली. आंदोलकांनी झेंडे घेऊन घोषणाबाजी करत प्रवेशद्वारावर आंदोलन केले. त्यानंतर खाली बसून घोषणाबाजीही त्यांनी केली. जोपर्यंत विद्यापीठ कारवाई करत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी यावेळी घेतला होता.  विद्यापीठ प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक ८ मध्ये सुमारे ७५० ग्रॅम गांजा सापडला होता. विद्यापीठ प्रशासनाने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासन हे प्रकरण दडपत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटना करत असून कारवाईची मागणी केली होती. ही घटना १४ मे रोजी उघडकीस आली. एवढा गंभीर प्रकार घडूनही पुणे विद्यापीठ प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले होते. या घटनेला १० दिवस लोटल्यानंतरही काहीच ठोस कृती विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली नाही. केवळ या प्रकरणावर चौकशी समिती नेमण्यात येईल असे सांगण्यात आले होते. 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठagitationआंदोलनStudentविद्यार्थीDrugsअमली पदार्थPoliceपोलिसEducationशिक्षण