एक वर्षापासून रखडल्या नियुक्त्या ; एमपीएससी पास उमेदवारांचे बेमुदत उपाेषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 13:47 IST2019-09-06T13:46:22+5:302019-09-06T13:47:21+5:30

रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ करण्यासाठी एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयावर माेर्चा काढला.

agitation of mpsc passed student | एक वर्षापासून रखडल्या नियुक्त्या ; एमपीएससी पास उमेदवारांचे बेमुदत उपाेषण

एक वर्षापासून रखडल्या नियुक्त्या ; एमपीएससी पास उमेदवारांचे बेमुदत उपाेषण

पुणे : एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण हाेऊन एक वर्ष उलटले तरी नियुक्त झाली नसल्याने परीक्षा पास झालेल्या उमेदवारांनी बेमुदत उपाेषणाचा पवित्रा घेतला आहे. क्लास 1 आणि क्लास 2 या पदांसाठी 1350 उमेदवारांची निवड झाली असून त्यांची नियुक्ती अद्याप झालेली नाही. त्यामुळे या नियुक्त्या तात्काळ करण्याची मागणी करत उपाेषणाचा इशारा उमेदवारांनी दिला आहे.

आज सकाळी पुणे रेल्वेस्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर माेर्चा देखील काढण्यात आला. या माेर्चात हजाराे उमेदवार सहभागी झाले हाेते. आता तरी दाखवा इच्छाशक्ती तात्काळ द्या नियुक्ती, परीवहन विभागात अधिकाऱ्यांची कमी तरी मिळत नाही नियुक्ती, मुख्यमंत्री महाेदय तात्काळ द्या नियुक्ती असे फलक हातात धरण्यात आले हाेते. तसेच हेच का तुमचे अच्छे दिन असा सवाल देखील आंदाेलक उमेदवारांनी सरकारला विचारला. तसेच नाेकरी आमच्या हक्काची नाही काेणाच्या बापाची अशा घाेषणा देखील यावेळी देण्यात आल्या. 

शेकडाे उमेदवार या आंदाेलनात सहभागी झाले हाेते. यात महिलांची संख्या देखील अधिक हाेती. 

Web Title: agitation of mpsc passed student