शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच लाखांची लाच घेताना एजंटाला अटक

By admin | Updated: March 25, 2015 00:22 IST

अनेक वर्षापासून थकबाकी असलेल्या करमणूक कर अधिकाऱ्यांशी तडजोड करून कमी करून देतो असे सांगून साडे पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या एका एजंटाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

पुणे : अनेक वर्षापासून थकबाकी असलेल्या करमणूक कर अधिकाऱ्यांशी तडजोड करून कमी करून देतो असे सांगून साडे पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या एका एजंटाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. मंगळवारी दुपारी एक वाजता डेक्कन जिमखाना येथे ही कारवाई करण्यात आली.दीपक शंकर शिवले (वय ४२) असे त्या एजंटाचे नाव आहे. तो हाथवे केबल अ‍ॅन्ड डेटा कॉमचा असीस्टंट वाईस प्रेसिडेंन्ट म्हणून कार्यरत आहे. तक्रारदारांचा केबलचा व्यवसाय आहे. त्यांचा केबल कराची पूर्वीची थकबाकी कमी करून देतो असे सांगून दीपक शिवले याने त्यांच्याशी संपर्क साधला. करमणूक अधिकाऱ्यांशी तडजोड करून देण्याचे आमिष त्याने दाखविले. तक्रारदारांनी याविरूध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार मंगळवारी डेक्कन जिमखाना येथील स्टरलिंग प्लाझा येथे सापळा रचण्यात आला. त्यावेळी साडे पाच लाखांची रक्कम स्वीकारताना शिवले याला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)शासकीय अधिकाऱ्याचा सहभाग नसलेली कारवाई४लाच स्वीकारण्याची कारवाई शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रामुख्याने करण्यात येते, त्याचबरोबर त्यांच्यावतीने पैसे स्वीकारणाऱ्या एजंटलाही अटक केली जाते. याप्रकरणातील लाचेची रक्कम ही लाखोंच्या घरात होती. मात्र यामध्ये एकाही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा सहभाग नाही. केवळ खाजगी एजंटच इतकी मोठी रक्कम घेत असताना आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.