दोन महिन्यानंतर पथदिवे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:08 IST2020-12-07T04:08:57+5:302020-12-07T04:08:57+5:30

पुणे कॅम्प: येथील १०८, एम.जी. रोड ते मोती बिल्डिंग पर्यंतच्या मागील बाजूच्या गल्लीत गेल्या २ महिन्यापासून बंद असलेले ...

After two months the streetlights start | दोन महिन्यानंतर पथदिवे सुरू

दोन महिन्यानंतर पथदिवे सुरू

पुणे कॅम्प: येथील १०८, एम.जी. रोड ते मोती बिल्डिंग पर्यंतच्या मागील बाजूच्या गल्लीत गेल्या २ महिन्यापासून बंद असलेले पथदिवे आज स्थानिक नगरसेवकाच्या दणक्याने पुन्हा सुरू झाले.

१०८ एम जी रोड ते मोती बिल्डिंग हा परिसर व्यापारी तसेच निवासी लोकवस्तीचा आहे. या रस्त्याच्या अगदी पाठीमागेच फॅशन स्ट्रीट हे व्यापारी संकुल आहे. या दोन्हीच्या मध्यें ही मोठी गल्ली आहे. एमजी रोड वरील अनेक दुकाने, घरांची दुसरी दारे प्रवेश हे या गल्लीतून आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.

अनेक दिवस विद्युत विभागाकडे तक्रार करूनही काहीही तोडगा निघत नव्हता. येथील स्थानिक व्यापारी, कार्यकर्ते तिलक परदेशी, जसपाल जगदेव यांनी दोन दिवसांपुर्वी स्थानिक नगरसेवक अतुल गायकवाड यांची भेट घेऊन समस्या कथन केली. त्यानंतर विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्वरित समस्या सोडवण्याचे आदेश गायकवाड यांनी दिल्याने हा प्रश्न मार्गी लागला.

Web Title: After two months the streetlights start