शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

चिंचेची झाडे घेता घेता त्यांनी घरंच लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 9:07 PM

पुण्यातील धायरी भागात राहणाऱ्या विशाल बाळु पाेकळे यांच्या घरावर दराेडा घालणाऱ्यांना पकडण्यात खंडणी विराेधी पथकाला यश आले आहे.

पुणे : पुण्यातील धायरी भागात राहणाऱ्या विशाल बाळु पाेकळे यांच्या घरावर दराेडा घालणाऱ्यांना पकडण्यात खंडणी विराेधी पथकाला यश आले आहे. अनेक वर्षांपासून पाेकळे यांच्या बागेतील चिंचेची झाडे घेण्यासाठी येणाऱ्यांनीच हा दराेडा घातल्याचे समाेर आले आहे. पाेलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून एकूण 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

याप्रकरणी पाेलिसांनी साेमनाथ विठ्ठल माने ( रा. धायरी), प्रविण विलास दाेडमिसे (वय 25 रा. भुगाव), सागर निलाप्पा गायकवाड (वय 23), संभाजी सिताराम गाेरे (वय 30)  यांना अटक केली आहे. तर एक आराेपी फरार आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 मार्च 2019 राेजी मध्यरात्री 5 ते 7 दराेडेखाेरांनी रायकरमळा, धायरी येथे राहणारे बागायतदार शेतकरी विशाल पाेकळे यांच्या घराचा दरवाजा ताेडून घरात प्रवेश केला. घरात असलेले पाेकळे यांचे आई, वडील आणि पत्नीचे दराेडेखाेरांनी हातपाय बांधले. तसेच त्यांना काठीने, लाथा- बुक्याने मारहाण करुन धरातील साेन्या चांदीचे दागीने, राेख रक्कम, माेबाईलसह नवीन माेटारसायकल दराेडा टाकून चाेरुन नेली. याप्रकरणी पाेकळे यांच्या पत्नी निता यांनी सिंहगडराेड पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली हाेती. त्यांच्या तक्रारीवरुन पाेलिसांनी गुन्हा दाखल केला हाेता. 

या गुन्ह्याचा तपास खंडणी विराेधी पथकाचे पाेलीस निरीक्षक रघुनाथ जाधव व त्यांचे अधिकारी व कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे करीत हाेते. पाेलिसांनी पाेकळे यांच्याकडे काेणाचे येणे जाणे हाेते. काेणाशी वाद हाेते का या अनुशंगाने तपास करण्यास सुरुवात केली. पाेलिसांना तपास करत असताना पाेकळे यांच्याकडे अनेक वर्षांपासून चिंचेची झाडे घेण्यासाठी येणाऱ्या साेमनाथ माने याने त्याच्या साथिदारांच्या मदतीने हा दराेडा घातला असल्याची खबर मिळाली. या माहितीच्या आधारे शाेध घेत पाेलिसांनी माने याला धायरी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखाेल तपास केल्यानंतर त्याने साथिदारांच्या मदतीने दराेडा घातल्याचे कबुल केले. त्यानंतर पाेलिसांनी इतर आराेपींना अटक केली. अद्याप एक आराेपी फरार असून पाेलीस त्याचा शाेध घेत आहेत. पकडलेल्या आराेपींकडे पाेलिसांनी चाैकशी केल्यानंतर त्यांनी सर्वांनी मिळून गुन्हा केल्याचे कबूल केले. अटक केलेले आराेपी हे रेकाॅर्डवरील अट्टल गुन्हेगार आहेत.

खंडणी विराेधी पथकाने या आराेपींना पुढील तपासासाठी सिंहगडराेड पाेलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

टॅग्स :DacoityदरोडाPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी