शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ३ लाख १२ हजार दुबार मतदार यादीतून कमी

By admin | Updated: September 23, 2015 03:06 IST

जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने वेळोवेळी नोटीस देऊन देखील लाखो मतदारांनी आपले दुबार नाव, मयत झालेल्या व्यक्तींचे नाव कमी करण्यासाठी अर्ज केले नाहीत.

पुणे : जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने वेळोवेळी नोटीस देऊन देखील लाखो मतदारांनी आपले दुबार नाव, मयत झालेल्या व्यक्तींचे नाव कमी करण्यासाठी अर्ज केले नाहीत. यामुळे दुबार मतदारांवर कडक कारवाई करुन अशी नावे त्वरीत डिलिट करणयाचे आदेश केंद्रीय निवडणुक आयोगान जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या आदेशानुसार येत्या दोन दरम्यान जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार दुबार, मयत मतदारांची नावे यादीतून डिलिट करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.जिल्हा निवडणूक कार्यालयांच्या वतीने जिल्ह्यातील मयत, दुबार आणि स्थलांतरित मतदारांची स्वतंत्र यादी तयार केली आहे. अशा मतदारांची यादी सर्व विधानसभा मतदार संघात संबंधित मतदार नोंदणी अधिका-यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असलेल्या मतदारांना नोटीसा पाठवून त्यांना नक्की कोणत्या मतदार संघात नाव कायम ठेवायचे याची विचारणा केली आहे. एकाच व्यक्तींचे दोन मतदार संघात नाव असणे कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे या नोटीसीला उत्तर न देणा-या मतदारांवर कारवाई करुन त्यांची नावे अखेर डिलिट करण्यात येणार आहे. जिल्ह्यात २१ विधानसभा मतदार संघात ८ हजार ९४७ मतदार स्थलांतरीत, १२ हजार ८४५ मतदार मयत आणि तब्बल ४ लाख ६४ हजार २३८ मतदार दुबार आहेत. या मतदारांमुळे जिल्ह्याची मतदार यादी मोठ्या प्रमाणात फुगली आहे. त्यामुळे आता ही नावे कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यात आता पर्यंत सुमारे ३ लाख १२ हजार नावे यादीतून डिलिट करण्यात आली असल्याचे राव यांनी सांगितले.यामध्ये सर्वांधिक ८१ हजार चिंचवड विधानसभा मतदार संघ, ४२ हजार भोसरी आणि ३७ हजार मतदार खडकवासला मतदार संघातील आहेत. (प्रतिनिधी)