शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वकिलांना माफी मागण्याचा आदेश

By admin | Updated: July 7, 2015 05:11 IST

खंडपीठासाठी पुण्यातील वकिलांनी केलेल्या आंदोलनाबद्दल माफी मागावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे बार असोसिएशनला दिला आहे.

पुणे : खंडपीठासाठी पुण्यातील वकिलांनी केलेल्या आंदोलनाबद्दल माफी मागावी तसेच भविष्यात अशा प्रकारचे आंदोलन करणार नाही हे प्रतिज्ञापत्रावर दाखल करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे बार असोसिएशनला दिला आहे. मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि रेवती डेरे यांनी हा आदेश दिला आहे.पुण्याला खंडपीठ मिळावे या मागणीसाठी वकिलांनी १६ दिवस न्यायालयीन कामकाज बंद केले. वकिलांच्या बंदमुळे त्रास होत असल्याची तक्रार मुंबई उच्च न्यायालयाकडे दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही तक्रार जनहित याचिका म्हणून दाखल करुन घेतली. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत पुण्यातील आंदोलनाबाबत सोमवारपर्यंत निर्णय कळविण्याचा आदेश दिला होता.पुण्यातील वकिलांनी खंडपीठ मागणीसाठी सुरु केलेले आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती, असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश शेडगे आणि पदाधिकाऱ्यांनी सोमवारी उच्च न्यायालयात दिली.पुणे बार असोसिएशनने पुन्हा बंद करणार नाही. केलेल्या बंदसंदर्भात माफी मागणार का व तसे प्रतिज्ञापत्रावर दाखल करावे. बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाने आजपर्यंत पुणे बार असोसिएशनच्या व जिल्ह्यातील वकिलांवर काय कारवाई केली, त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करावे. तसेच त्या वकिलांवर डिसिप्लीनरी अ‍ॅक्शन घ्यावी. तसे प्रतिज्ञापत्र दाखल करावे. व्हॉटसअ‍ॅपवर बदनामीकारक धमकी देणारे एसएमएस पाठविले असतील तर अर्जदाराने न्यायालयात दाखल करावे. जिल्ह्यात काय परिस्थिती आहे ? कोणी वकील कामावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न करतोय का याचा अहवाल मुख्य प्रबंधक उच्च न्यायालय यांनी २० जुलै रोजी दाखल करावा, असा आदेश न्यायमूर्ती अभय ओक आणि रेवती डेरे यांनी दिला.> दरम्यान गेली १६ दिवस वकिलांच्या बंदमुळे शुकशुकाट असलेले न्यायालय सोमवारी पुन्हा पहिल्यासारखे गजबजले. दिवसभर कोटार्तील वकिलांमध्ये बंदबाबत चर्चा सुरु असल्याचे चित्र होते. अनेक वकिलांच्या आंदोलनामध्ये सर्वाधिक फटका आरोपींना बसला. आरोपींना जामिन न मिळाल्यामुळे अनेकांची येरवडा जेलमध्ये रवानगी झाली होती सोमवारी सर्वाधिक जामिनाच्या केसेसवर सुनावणी झाली.> पुण्याला खंडपीठ मिळावे ही पुण्यातील वकिलांची गेल्या अनेक वषार्पासूनची मागणी असून १९७८ मध्ये खंडपीठासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच पुण्याला यासंदर्भात बाजू मांडण्यासाठी तातडीने संधी देण्यात यावी, असे पत्र सोमवारी उच्च न्यायालयात दिले असल्याची माहिती अ‍ॅड. शेडगे यांनी दिली.