छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर जाहिरात; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 10:32 IST2026-01-24T10:31:34+5:302026-01-24T10:32:04+5:30

पुणे : विमाननगर परिसरात पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत बोर्डावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेवर बेकायदेशीर जाहिरात लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस ...

Advertisement on Chhatrapati Shivaji Maharaj's photo; Case registered against unknown | छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर जाहिरात; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर जाहिरात; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : विमाननगर परिसरात पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत बोर्डावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेवर बेकायदेशीर जाहिरात लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध 'महाराष्ट्र मालमत्ता विरुपण प्रतिबंधक कायद्या'न्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराजांच्या प्रतिमेचा जाहिरातीसाठी वापर केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. यासंदर्भात 'पतित पावन संघटने'ने महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. "महाराजांची विटंबना सहन केली जाणार नाही; दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन छेडले जाईल," असा इशारा संघटनेने दिला होता. पुराव्याखातर संघटनेने व्हिडिओ आणि संबंधित जाहिरातीचे क्रमांकही सादर केले होते.

या तक्रारीची दखल घेत आकाशचिन्ह विभागाने तातडीने कारवाई केली. याचदरम्यान, 'दूर्वांकुर डेव्हलपर्स'ने वाघोलीतील प्लॉट विक्रीचे बेकायदेशीर फलक ठिकठिकाणी लावल्याचेही समोर आले आहे. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता फलक लावल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रतिफलक १० हजार रुपये दंड आकारण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

"यापुढे राष्ट्रपुरुषांच्या नामफलकांवर स्टिकर्स लावल्यास किंवा विद्रूपीकरण केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता थेट गुन्हे दाखल करून दंड वसूल केला जाईल." - संजय पोळ, सहायक आयुक्त, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय

Web Title : शिवाजी महाराज के फोटो पर विज्ञापन: अज्ञात व्यक्ति के खिलाफ एफआईआर दर्ज

Web Summary : पुणे में शिवाजी महाराज के फोटो पर अनाधिकृत विज्ञापन से आक्रोश। पुलिस ने मामला दर्ज किया। 'पतित पावन संघटना' ने कार्रवाई की मांग करते हुए विरोध प्रदर्शन किया। अवैध संपत्ति बिक्री के बैनर पर भी जुर्माना और एफआईआर दर्ज। अधिकारियों ने राष्ट्रीय नायकों के नामों को विरूपित करने के खिलाफ चेतावनी दी।

Web Title : Advertisement on Shivaji Maharaj's Photo: FIR Filed Against Unknown Person

Web Summary : Unauthorized advertisement on Shivaji Maharaj's photo sparked outrage in Pune. Police filed a case. 'Patit Pavan Sanghatana' protested, demanding action. Illegal property sale banners also led to fines and FIRs. Officials warn against defacing national heroes' names.