शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त आयुक्त मारहाण प्रकरण ; मनपा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदाेलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 17:39 IST

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना काल महापाैर दालनात काॅंग्रेसच्या नगरसेवकांनी मारहान केली हाेती. त्याच्या निषेधार्थ आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदाेलन केले.

पुणे : पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना काल महापाैर दालनात काॅंग्रेसच्या नगरसेवकांनी मारहान केली हाेती. त्याच्या निषेधार्थ आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदाेलन केले. या आंदाेलनात निंबाळकर देखील सहभागी झाले हाेते. पालिकाभवनात असलेल्या महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमाेर हे आंदाेलन करण्यात आले. 

नदीमधील जलपर्णी काढण्याच्या निविदेचा विषय गेले  काही दिवस चर्चेत आहे.या विषयावरून महापौरांच्या दालनासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनानंतर सुरु असलेल्या चर्चेत स्पष्टीकरण देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर दालनात आले. मात्र ज्यांचा निविदा प्रक्रियेत समावेश होता त्यांनी स्पष्टीकरण देऊ नये अशी नगरसेवकांची मागणी होती. त्यावेळी सुरु असलेल्या चर्चेत 'अधिकारी चोर आहेत', असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना निंबाळकर यांनी 'असे ऐकून घ्यायला आम्ही आलेलो नाही, तुमची काय लायकी आहे', असे सुनावले. यामुळे नगरसेवक संतप्त झाले.

तुम्ही आमची लायकी काढणारे कोण, असे म्हणत निंबाळकर यांना जाब विचारू लागले. त्यावेळी येथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्याने निंबाळकर यांच्या श्रीमुखात भडकवली. याचे पडसाद आज महापालिकेच उमटले. पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आज काम बंद आंदाेलन केले. तसेच कालच्या घटनेचा तीव्र निषेध केला. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाagitationआंदोलनPuneपुणे