अभिनेत्री श्रेया बुगडे यांना यावर्षीचा राम नगरकर कलागौरव पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 16:52 IST2026-03-06T16:51:44+5:302026-03-06T16:52:40+5:30

पुरस्कार वितरण समारंभानंतर सुप्रसिद्ध निवेदक राजेश दामले हे श्रेया बुगडे यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत

Actress Shreya Bugde announced for this year's Ram Nagarkar Kalagaurav Award | अभिनेत्री श्रेया बुगडे यांना यावर्षीचा राम नगरकर कलागौरव पुरस्कार जाहीर

अभिनेत्री श्रेया बुगडे यांना यावर्षीचा राम नगरकर कलागौरव पुरस्कार जाहीर

पुणे: राम नगरकर कला अकादमी आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने देण्यात येणारा राम नगरकर कलागौरव पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांना जाहीर झाला आहे.

ख्यातनाम विनोदी अभिनेते राम नगरकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ दरवर्षी सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रुपये ११ हजार रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे सहावे वर्ष असून येत्या शनिवार दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या हस्ते श्रेया बुगडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे राम नगरकर यांच्या स्नुषा डॉ. वैजयंती वंदन नगरकर आणि बेलवलकर सांस्कृतिक मंचचे संस्थापक समीर बेलवलकर यांनी कळवले आहे. पुरस्कार वितरण समारंभानंतर सुप्रसिद्ध निवेदक राजेश दामले हे श्रेया बुगडे यांची प्रकट मुलाखत घेतील.

Web Title : श्रेया बुगडे को मिलेगा राम नगरकर कला गौरव पुरस्कार

Web Summary : अभिनेत्री श्रेया बुगडे को राम नगरकर कला गौरव पुरस्कार से सम्मानित किया जाएगा। पुरस्कार समारोह 14 मार्च को तिलक स्मारक मंदिर, पुणे में होगा। वंदना गुप्ते पुरस्कार प्रदान करेंगी, जिसके बाद राजेश दामले के साथ एक साक्षात्कार होगा।

Web Title : Shreya Bugde to Receive Ram Nagarkar Kala Gaurav Award

Web Summary : Actress Shreya Bugde will be awarded the Ram Nagarkar Kala Gaurav Puraskar. The award ceremony will be held on March 14th at Tilak Smarak Mandir, Pune. Vandana Gupte will present the award, followed by an interview with Rajesh Damle.