अभिनेता अक्षयकुमार, अर्शद वारसी हाजिर हो...! दोघांसह निर्मात्याला पुणे न्यायालयाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 17:05 IST2025-08-20T17:04:42+5:302025-08-20T17:05:22+5:30

थेट वकील व न्यायाधीशांवर असभ्य भाषेत विनोद केल्याप्रकरणी चित्रपट प्रदर्शनावर मनाई हुकूम मिळण्यासाठी २ वकिलांनी पुणे कोर्टात हे प्रकरण दाखल केले होते

Actor Akshay Kumar, Arshad Warsi appear...! Pune court slaps producer along with both | अभिनेता अक्षयकुमार, अर्शद वारसी हाजिर हो...! दोघांसह निर्मात्याला पुणे न्यायालयाचा दणका

अभिनेता अक्षयकुमार, अर्शद वारसी हाजिर हो...! दोघांसह निर्मात्याला पुणे न्यायालयाचा दणका

पुणे: एका हिंदी चित्रपटात कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली कलाकार व निर्माते यांनी थेट वकील व न्यायाधीशांवर असभ्य भाषेत विनोद केल्याप्रकरणी चित्रपट प्रदर्शनावर मनाई हुकूम मिळण्यासाठी पुण्यातील दोन वकिलांनी दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार यांना समन्स बजावले असून, दि. २८ ऑगस्ट रोजी निर्मात्यासह अभिनेता अक्षयकुमार, अर्शद वारसी यांना ' हाजिर हो' चे आदेश दिले आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोव-यात सापडला आहे.

वकील आणि न्यायालयाभोवती फिरते असे चित्रपटाचे कथानक दाखविण्यात आले आहे. मात्र स्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपटातील कलाकार व निर्माते यांनी चित्रपटात थेट वकील व न्यायाधीशांवर असभ्य भाषेत विनोद केले आहेत. चित्रपटातील कलाकार अक्षयकुमार आणि अर्शद वारसी यांनी वकिलांचा बॅण्ड (बो) घालून चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे वकिलांची प्रतिमा मलीन करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर चित्रपटात वकिली व्यवसायाचा अवमान करण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये याकरीता ॲड. वाजेद खान (बिडकर) व ॲड. गणेश म्हस्के यांनी मा. दिवाणी न्यायाधीश पुणे यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. दिवाणी न्यायाधीश पुणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर ) जे. जी. पवार यांनी अभिनेते अक्षय कुमार व अर्शद वारसी यांना २८ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत.

Web Title: Actor Akshay Kumar, Arshad Warsi appear...! Pune court slaps producer along with both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.