शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

कार्यकर्त्यांना वाटते मीच उपमुख्यमंत्री व्हावे : अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 7:21 PM

सोलापुर जिल्ह्यातील विवाह सोहळ्यात अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकत्र

ठळक मुद्दे पक्षप्रमुखच ठरवतील, फडणवीस यांच्याशी हवापाण्याच्या गप्पाबारामती मतदारसंघांचे प्रश्न मार्गी लावणे हे माझे पहिले काम

बारामती : कार्यकर्त्यांना वाटते मीच उपमुख्यमंत्री व्हावे. पण ते ठरविण्याचा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे.  खाते वाटपाबाबत मुख्यमंत्रीच अधिक विस्ताराने सांगू शकतील, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगितले. बारामती येथे ते पत्रकारांशी बोलत होते. सोलापुर जिल्ह्यातील एका विवाह सोहळ्यात अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बराच वेळ शेजारी बसून संवाद साधत होते. या  पार्श्वभूमीवर पवार म्हणाले की,  मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही शेजारी बसून हवा-पाण्याच्याच गप्पा मारल्यात. शेजारी बसलो म्हणजे लगेच काहीतरी सुरु झालंय अस समजण्याचे कारण नाही. राजकीय व्यक्ती कधी कायमच्या एकमेकांच्या दुश्मन नसतात.  सत्ताधारी किंवा विरोधक एकत्र आल्यानंतर एकमेकांना नमस्कार होतो. एकत्र बसतात, चर्चा होते. यात दुसर काहीही नव्हते. संजय शिंदे यांनी आग्रहाने मला व इतरांना बोलावले होते. त्यामुळे त्या लग्नाला आम्ही गेलो होतो. खुर्च्या ठेवताना अशा ठेवल्या की माझी व देवेंद्र यांची खुर्ची शेजारी शेजारी आली इतकेच.त्यामुळे शेजारी बसल्यावर आम्ही थोडीफार इकडची तिकडची चर्चा केली, कस काय पाऊसपाणी वगेरे. फडणवीस यांच्या मुलाखतीवर काहीही बोलणार नाही, मला बारामतीची प्रचंड कामे आहेत, त्यांची कामे करणे हेच माझे एकमेव काम आहे, तेच मी करत राहणार आहे, अशा शब्दांत त्यांनी फडणवीस यांच्या मुलाखतीवर उत्तर देण्यास स्पष्टपणे नकार दिला.  ते म्हणाले,  बारामती मतदारसंघांचे प्रश्न मार्गी लावणे हे माझे पहिले काम आहे. तेच मी करतो.  बारामतीकरांनी १ लाख ६५ हजारांचे मताधिक्य देऊन जबाबदारी सोपविली आहे. 

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस