शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर गुंडांचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर होणार कारवाई

By नितीश गोवंडे | Updated: December 27, 2024 18:53 IST

सोशल मीडियावरील रिल्सवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे लक्ष

पुणे : सोशल मीडियावर शहरातील गुंडांचे रिल्स व्हायरल करत गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने दंड थोपटले आहेत. पोलिसांकडून अशा आरोपींना बोलवून घेत त्यांची खरडपट्टी काढण्यास सुरूवात केली आहे. सराईत गुन्हेगारांसह त्यांच्या नावाने हातात शस्त्रास्त्रे घेणे, भाईगिरीचे ऑडिओ-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणारे आता गोत्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने सोशल मीडियावरील गँगस्टर प्रेरित रायझिंग गँगला फैलावर घेतले आहे.गुंड गजानन मारणे याच्या नावाने सोशल मीडियावर रिल्स व्हायरल करत दबंगगिरी करणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथक-१ ने चांगलाच दणका दिला. त्यांना बोलावून घेत विविध सोशल मीडिया अकाैंटवरील ५० रिल्स डिलीट करण्यात आल्या तसेच पुन्हा असे करणार नसल्याची हमी त्यांच्याकडून घेण्यात आली. सूरज काकडे आणि सोमनाथ ऊर्फ पप्पू रामचंद्र मोरे (दोघे रा. हांडेवाडी) अशी दबंगगिरी करणाऱ्यांची नावे आहेत. सोशल मीडियावर दहशतीचे किंवा गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, शस्त्रास्त्रांचा वापर करून व्हिडिओ करणे, सराईत गुंडांसह टोळी प्रमुखांना आदर्श मानत सोशल मीडियावर दबंगगिरी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली.गुंडांसह त्यांच्या चाहत्यांकडून व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे उघडकीस आले आहे. प्रामुख्याने व्हिडिओद्वारे फिल्मी स्टाईल दमदाटी करणे, नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे अशा पद्धतीने गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्यांचा शोध घेण्यास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुरूवात केली आहे. 

सोशल मीडियाद्वारे शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करणे, गुंडगिरीला प्रेरित होऊन त्यांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. शहरातील सर्व सराईत टोळ्यांच्या सोशल मीडिया हालचालींवरही आमच्याकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल