पुणे : शहरात वेगाने वाढणाऱ्या बांधकामांमुळे हवेतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत आहे. विशेषतः रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटमधून उडणारे सिमेंट कण आणि धूळ यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटमुळे हाेणारे वायुप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी नियमावली केली जाणार आहे. त्यानंतर निवासी क्षेत्रातील आरएमसी प्रकल्पावर कारवाई केली जाईल, असे महापौर मंजूषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. आणि उपायुक्त किशोरी शिंदे उपस्थित होत्या. आरएमसी प्लांटसाठी लवकरच सविस्तर चर्चा करून पॉलिसी तयार केली जाईल. संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नियम निश्चित केले जातील. शहरातील काही प्लांट राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्याने त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याचे आरोप होत आहे. त्यावर बोलताना मंजूषा नागपुरे म्हणाल्या, नियमावली तयार केल्यानंतर कारवाई केली जाईल, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही आहोत. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका सातत्याने उपाययोजना राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या गाईडलाईन्सनुसार बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण मोजण्यासाठी सेन्सर्स बसविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात पाच हजार चौरस फुटांवरील बांधकामांच्या ठिकाणी हे सेन्सर बसविणे बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
Web Summary : Pune's rising air pollution, especially from RMC plants, prompts new regulations. Mayor Nagpure assures action against violators, even politically connected ones, after policy implementation. Sensors will monitor construction site pollution, starting with larger projects, as part of ongoing mitigation efforts.
Web Summary : पुणे में आरएमसी संयंत्रों से बढ़ते वायु प्रदूषण को रोकने के लिए नए नियम बनाए जा रहे हैं। महापौर नागपुरे ने नीति लागू होने के बाद उल्लंघनकर्ताओं, यहां तक कि राजनीतिक रूप से जुड़े लोगों के खिलाफ भी कार्रवाई का आश्वासन दिया है। बड़े परियोजनाओं से शुरू करते हुए, सेंसर निर्माण स्थलों पर प्रदूषण की निगरानी करेंगे।