नियमांचे पालन न करणाऱ्या नामांकितसह ४७ हॉटेलवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:17 IST2021-02-23T04:17:53+5:302021-02-23T04:17:53+5:30

पुणे : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जाहीर केलेल्या नियमावलीचे पालन न करणाऱ्या, शहरातील वैशाली, गुडलक ...

Action taken against 47 hotels including non-compliant | नियमांचे पालन न करणाऱ्या नामांकितसह ४७ हॉटेलवर कारवाई

नियमांचे पालन न करणाऱ्या नामांकितसह ४७ हॉटेलवर कारवाई

पुणे : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जाहीर केलेल्या नियमावलीचे पालन न करणाऱ्या, शहरातील वैशाली, गुडलक हॉटेलसह ४७ हॉटेल्सवर पुणे महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे़

फर्ग्युसन, जंगली महाराज रस्त्यांसह शहरातील अन्य भागातील १७ फेब्रुवारीपासून सोमवारपर्यंत केलेल्या कारवाई या ४७ हॉटेलकडून १ लाख ५१ हजार ९५० रूपये दंडवसुली केली आहे़ शासनाने निर्देश दिल्यानुसार, हॉटेलमध्ये दोन टेबलमध्ये अंतर न ठेवणे, आसन व्यवस्था एका आड एक नसणे, सॅनिटायझरचा वापर न करणे आदींबाबत ही कारवाई करण्यात आली़ पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून, प्रत्येक हॉटेलवर प्रत्येकी पाच हजार रूपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ़ मनीषा नाईक यांनी दिली़

दरम्यान, मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांकडून १७ फेब्रुवारीपासून १ लाख ५५ हजार ५० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे़ शहरात सोमवारपासून रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने, आता या कारवाईचे स्वरूप आणखी वाढले जाण्याची शक्यता आहे़ त्यातच या कारवाईचे अधिकारी हे सर्व आरोग्य अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले गेले असल्याने आता पोलिसांसह महापालिकेचे तपासणी पथकाचाही वॉच सर्वांवर राहणार आहे़

----------------------------------

Web Title: Action taken against 47 hotels including non-compliant