शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

हेल्मेटसक्तीसाठी आरटीओचीही कारवाई, सोमवारपासून परवाना निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 12:23 PM

येत्या सोमवारपासून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू केली जाणार आहे.

ठळक मुद्देवाहतूक पोलीसांची घेणार मदत : दोन तास सक्तीचे समुपदेशनहेल्मेट व सीट बेल्ट विषयक नियमांचा भंग केल्यास संबंधित वाहनचालकाला परवाना निलंबितहेल्मेटबाबतचे नियम संपुर्ण राज्यभर लागू शहरातील हेल्मेटसक्ती विरोधी गट सक्रीय झाले असून त्याला कडाडून विरोध रस्ते सुरक्षा समितीपुढे रस्ते अपघात नियंत्रणासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा वार्षिक अहवाल सादर

पुणे : हेल्मेटसक्तीच्या पोलिसांच्या निर्णयावर वाद सुरू असतानाच आता प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही (आरटीओ) कारवाईचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. दंडात्मक कारवाईसह परवानाही निलंबित केला जाईल. इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा परवानाही निलंबित करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतुक पोलिसांचे सहकार्य घेतले जाईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली.पोलिसांनी  १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर शहरातील हेल्मेटसक्ती विरोधी गट सक्रीय झाले असून त्याला कडाडून विरोध केला जात आहे. आता ‘आरटीओ’नेही हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीपुढे रस्ते अपघात नियंत्रणासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा वार्षिक अहवाल नुकताच सादर केला आहे. याअनुषंगाने या समितीने दिलेल्या सुचनांनुसार केलेल्या कारवाईचा आढावा गुरूवारी राज्याच्या मुख्य सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातून जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, वाहतुक पोलिस उपायुक्त, आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता उपस्थित होते. या बैठकीमध्ये मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्याचे आदेश सचिवांनी दिले आहेत. हेल्मेटसह वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाºयांची तपासणी मोहिम राबवून दोषी चालकांविरूध्द कडक कारवाई करण्याचे तसेच वाहन अटकावून ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.  आजरी म्हणाले, पोलिसांनी दि.१जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. पण बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार हेल्मेटसह सर्वच वाहतुक नियमांबाबत सोमवारपासून कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासूनच वाहतुक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली जाईल. हेल्मेटबाबतचे नियम वाहन चालविणारी व्यक्ती तसेच मागे बसलेल्या व्यक्तीसाठी संपुर्ण राज्यभर लागू असतील.याआधी केवळ दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. यापुढे हेल्मेट नसल्यास ५०० रुपयांचा दंड आकारून परवाना निलंबित करण्यात येईल. वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा परवानाही निलंबित करण्यात येणार असल्याचे आजरी यांनी सांगितले.---------------  समुपदेशनानंतरच मिळणार परवाना हेल्मेट व सीट बेल्ट विषयक नियमांचा भंग केल्यास संबंधित वाहनचालकाला सुरूवातील दंड आकारून परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतर तडजोड शुल्क वसुल करण्यापुर्वी संबंधित नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीस कमीतकमी दोन तास कालावधीच्या रस्ता सुरक्षा विषयक नियमांच्या समुपदेशासाठी उपस्थित राहावे लागेल. या समुपेदशनाला उपस्थित असल्याचा पुरावा दाखविल्यानंतरच परवाना परत दिला जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीस