Pune Crime: धालेवाडीत अवैध धंद्यावर कारवाई, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 12:33 IST2023-10-09T12:32:04+5:302023-10-09T12:33:11+5:30

कारवाईत पोलिसांनी सुमारे ८ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे....

Action on illegal business in Dhalewadi, goods worth eight and a half lakh seized | Pune Crime: धालेवाडीत अवैध धंद्यावर कारवाई, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: धालेवाडीत अवैध धंद्यावर कारवाई, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

जेजुरी (पुणे) :जेजुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धालेवाडी येथे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी जेजुरी पोलिसांच्या साहाय्याने अवैध धंद्यावर मोठी कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी सुमारे ८ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बरडे यांना बेंद वस्ती नजीक नाझरे जलाशयाच्या कडेला असणाऱ्या एका विहिरीजवळ हातभट्टी गावठी दारूभट्टी असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी खात्री करून सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पी.एम. गावडे, उपनिरीक्षक एस.एल.पुजारी, सहायक फौजदार बाबर आदीसह या ठिकाणी धाड टाकली. तुला ठिकाणी हातभट्टीची गावठी दारू काढण्याचे काम सुरू असताना पोलिसांनी धाड टाकल्याने तेथे असलेला इसम संतोष राठोड हा पळून गेला.

पोलिसांनी दारू बनवण्यासाठी लागणारे सुमारे ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे ३ मोठ्या पातेल्यात असणारे २१ हजार लिटर कच्चे रसायन, सुमारे १४ हजार रुपये किमतीचे ६० लिटर गावठी दारू बनवलेले सात निळे प्लास्टिक कॅन, दहा हजार रुपये किमतीची ३ हॉर्स पॉवरची इलेक्ट्रिक मोटार आदी दारू पाडण्यासाठी लागणाऱ्या वस्तू जप्त केल्या आहेत. संपूर्ण हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली. अवैध धंदा करणारा आरोपी संतोष राठोड (रा.धालेवाडी, ता.पुरंदर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Action on illegal business in Dhalewadi, goods worth eight and a half lakh seized