चिंचवडमध्ये निवडणूक विभागाची मोठी कारवाई; तब्बल ४३ लाखांची रक्कम पकडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 13:11 IST2023-02-10T12:59:40+5:302023-02-10T13:11:13+5:30
एवढी मोठी रक्कम कुणाची व कुठे जात होती याची तपासणी निवडणूक आयोगाचे तपास पथक करत आहे

चिंचवडमध्ये निवडणूक विभागाची मोठी कारवाई; तब्बल ४३ लाखांची रक्कम पकडली
चिंचवड: निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने आज चिंचवड मधील दळवीनगर चेक पोस्टवर ४३ लाख रूपयांची रक्कम पकडली. चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या वेळी चारचाकी वाहनांची तपासणी करताना ही कारवाई करण्यात आली.
चिंचवडमध्ये सकाळी साडेदहा च्या सुमारास चेक पोस्टवर एका चारचाकी वाहनातून ४३ लाख रुपयांची रोकड घेऊन जात असताना तपासणी दरम्यान दिसले. एवढी मोठी रक्कम कुणाची व कुठे जात होती याची तपासणी निवडणूक आयोगाचे तपास पथक करत आहे. संबंधित वाहचालक व्यावसायिक असून माझ्या मेडिकल व्यावसायाची ही रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असल्याचे चालक सांगत होता. मात्र याची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.