शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

दोन दिवसांत २ ठिकाणी खुनी हल्ला करत कॅश लुटणाऱ्या मामा-भाचे टोळीवर मोक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 16:08 IST

हे दोन्ही गुन्हे हे एकूण नऊ आरोपींनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुणे : शहरात एक नवीन टोळी सक्रीय झाली असून,दोन दिवसांत दोन ठिकाणी खुनी हल्ला करून कॅश लुटणाऱ्या मामा भाचे टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हे दोन्ही गुन्हे हे एकूण नऊ आरोपींनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 3 एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा रोडवरील अरण्येश्वर कॉर्नर येथील व्ही. आर. गुप्ता, देशी दारूचे दुकान, सुप्रील इंडस्ट्रीयल इस्टेट येथे 6 व्यक्तींनी दुकानात घुसून दुकानाचे मॅनेजर व कामगाराला रिव्हॉल्वरचा धाक दाखवत पालघनने व दारू मोजण्याच्या लोखंडी मापाने मारहाण करून त्यांच्याकडून 57,000- रु. जबरदस्तीने हिसकावून नेले होते. . 

याबाबत दुकानाचे मॅनेजर (वय-42, रा. बावधन, मुळशी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दि. 4 एप्रिलला 7 वाजण्याच्या सुमारास सुमारास स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण थिएटर समोर ब्रिजखाली एका 50 वर्षीय वृत्तपत्र विक्रेत्याला चाकूने धमकावून त्यांच्याजवळील पेपर विक्रीचे जमलेले एकूण 90,300/- रु. असलेली बॅग अनोळखी व्यक्तींनी हिसकावून नेली होती. याबाबत दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना दत्तवाडी पोलिसांनी गौरव फडणीस (वय-30 वर्षे, रा. पर्वती दर्शन, पुणे) व अक्षय गरुड (वय-20 वर्षे, रा. व्ही.आय.टी. कॉलेजच्या मागे, अपर इंदिरानगर, पुणे) या दोन आरोपींना अटक केली होती.  या दोघांसह  सचिन पांडुरंग सोंडकर (वय-31वर्षे, रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे),  महादेव सुरेश नंदुरे (वय-20वर्षे, रा. दत्तनगर, कात्रज, पुणे)  चिराग संजय देशमुख (रा. खोपडेनगर, कात्रज, पुणे) यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यातील चार आरोपींवर वारजे पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल आहे. 

या आरोपींकडे पोलिसांनी आणखी चौकशी केली असता आरोपी ऋषिकेश उर्फ हुक्या श्रीकांत गाडे (रा. व्ही.आय.टी. कॉलेजच्या मागे, अपर इंदिरानगर,बिबवेवाडी, पुणे) याने स्वत:च्या नेतृत्वाखाली संघटीत टोळी तयार केली आहे. त्याने व त्याच्या टोळीने पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण भागात अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा टाकणे, दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी, गंभीर दुखापती,अग्निशस्त्रे, घातक शस्त्रे घेऊन दहशत माजविणे यांसारखे गुन्हे करून वर्चस्व निर्माण करणे असे गुन्हे केल्याची वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे. तर आरोपी गाडे याने स्वतंत्रपणे 57 गुन्हे केल्याची अशी एकूण 66  गुन्हे केल्याची नोंद पोलिसांना आढळून आली आहे.

टोळीप्रमुख ऋषिकेश उर्फ हुक्या गाडे याने  टोळीचे वर्चस्व व दहशत कायम ठेवण्याच्या उद्देश्याने संघटीत गुन्हेगारी कृत्य सातत्याने चालू ठेवले. तसेच या टोळीने बेकायदेशीर मार्गाने आर्थिक व इतर फायदा मिळविण्यासाठी वरील गुन्हे केलेले आहेत. त्यामुळे सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी या गुन्ह्याला मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांना सादर केला. त्यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. त्याप्रमाणे वरील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून या गुन्ह्याचा पुढील तपास स्वारगेट विभागाच्या सहा. पोलीस आयुक्त  सुषमा चव्हाण करीत आहेत.--------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस