HSRP न बसवलेल्या वाहनांवर १५ फेब्रुवारीपासून कारवाई; पुण्यात १५ लाख वाहनांना नंबर प्लेट लावणे बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:06 IST2026-02-11T17:05:45+5:302026-02-11T17:06:12+5:30

- अखेर परिवहन विभागाने १५ फेब्रुवारीपासून ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर थेट कारवाई करण्यात येणार

Action against vehicles not fitted with HSRP from February 15; 1.5 million vehicles in Pune yet to be fitted with number plates | HSRP न बसवलेल्या वाहनांवर १५ फेब्रुवारीपासून कारवाई; पुण्यात १५ लाख वाहनांना नंबर प्लेट लावणे बाकी

HSRP न बसवलेल्या वाहनांवर १५ फेब्रुवारीपासून कारवाई; पुण्यात १५ लाख वाहनांना नंबर प्लेट लावणे बाकी

पुणे : उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी परिवहन विभागाने पाच वेळा मुदतवाढ दिली होती. तरीही पुण्यासह राज्यातील वाहनधारकांचा प्रतिसाद अत्यंत कमी असल्याचे दिसून आहे. त्यामुळे अखेर परिवहन विभागाने १५ फेब्रुवारीपासून ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार जानेवारी २०२५ पासून प्रत्यक्ष नंबर प्लेट बसविण्यास सुरुवात झाली. पुणे शहर व जिल्ह्यात तब्बल २५ लाखांहून अधिक वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसवणे आवश्यक होते. मात्र, आतापर्यंत केवळ १० लाख ७० हजार वाहनधारकांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ८ लाख ६२ हजार वाहनांनाच प्रत्यक्ष नंबर प्लेट लावण्यात आली आहे.

अद्यापही सुमारे १५ लाख वाहनांनी नियमांचे पालन केलेले नाही. परिवहन विभागाने ‘एचएसआरपी’साठी ३० एप्रिल, ३० जून, १५ ऑगस्ट, ३० नोव्हेंबर आणि अखेर ३१ डिसेंबर २०२५ अशी टप्प्याटप्प्याने पाच वेळा मुदतवाढ दिली होती. ३१ डिसेंबरनंतरही कारवाई न करता वाहनधारकांना अतिरिक्त कालावधी देण्यात आला. मात्र, वारंवार सूचना देऊनही वाहनधारकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आता कडक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ फेब्रुवारीनंतर कोणालाही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

एचएसआरपी बसवून घ्या, अन्यथा दंड भरा

परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुदतीपूर्वी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना मर्यादित सवलत देण्यात आली आहे. मात्र, मुदतीनंतर नोंदणी किंवा अपॉइंटमेंट घेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तपासणीदरम्यान वाहनांची एचएसआरपी, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र (पीयूसी) आणि वाहनचालक परवाना यांचीही पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान, काही फिटमेंट केंद्रांवर अपॉइंटमेंट असूनही वाहनधारक वेळेवर न पोहोचल्याने प्रक्रियेत अडथळे येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी विलंब न करता एचएसआरपी बसवून नियमांचे पालन करावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

अशी आहे एचएसआरपी आकडेवारी

-एचएसआरपीसाठी नोंदणी केलेली वाहनसंख्या : १० लाख ७० हजार

-प्रत्यक्ष एचएसआरपी बसवलेली वाहने : ८ लाख ६२ हजार

-एचएसआरपीसाठी नोंदणी न केलेली वाहनसंख्या : १५ लाख ३० हजार

Web Title : पुणे में 15 फरवरी से HSRP बिना वाहनों पर कार्रवाई होगी।

Web Summary : पुणे में 15 फरवरी से एचएसआरपी के बिना वाहनों पर कार्रवाई होगी। समय सीमा बढ़ाने के बावजूद, पुणे में 15 लाख वाहनों को अभी भी अनिवार्य हाई-सिक्योरिटी नंबर प्लेट लगवानी है। परिवहन विभाग ने बार-बार नोटिस और विस्तार के बाद जुर्माने की चेतावनी दी है।

Web Title : Action on vehicles without HSRP from Feb 15 in Pune.

Web Summary : Pune vehicles lacking HSRP face action from February 15th. Despite extensions, 1.5 million vehicles in Pune still need the mandatory high-security number plates. Transport department warns of fines after repeated notices and extensions.