शिरूरमध्ये मांडवगण फराटा येथे जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 05:25 PM2021-06-28T17:25:23+5:302021-06-28T17:25:31+5:30

आठ जणांवर गुन्हा दाखल

Action against eight gamblers at Mandvagan Farata in Shirur; Two lakh items confiscated | शिरूरमध्ये मांडवगण फराटा येथे जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरूरमध्ये मांडवगण फराटा येथे जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देपोलिसांनी छापा टाकला असता सदर ठिकाणी ७ ते ८ लोक एका खोलीमध्ये जुगार खेळताना दिसून आले

मांडवगण फराटा: पोलिसांना गावाच्या हद्दीत काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच सापळा रचून आठ जणांना ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून चार मोटरसायकल, चार मोबाईल हॅन्डसेट रोख रक्कम असा एकूण २ लाख ६१ हजार १९० रु. किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी देवराम श्रीपती इथापे (वय ६७ वर्षे), प्रकाश पितांबर भालेराव (वय २४ वर्षे), सुनिल हिरामन राठोड (वय २३ वर्षे), दशस्थ वाल्मिक शेलार (वय ६० वर्षे), रवि फुलसिंग चव्हाण (वय ३७ वर्षे), दादा दशरथ मोहोळकर (वय ४१ वर्षे), महादेव शंकर भोईटे (वय ३० वर्षे), लक्ष्मण निवृत्ती शेळके ( ( वय ५८ वर्षे) सर्व (रा.मांडवगण फराटा तालुका शिरूर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावच्या हददीत काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती शिरूर पोलिसांना मिळाली. त्यांनी अचानकपणे छापा टाकला असता सदर ठिकाणी ७ ते ८ लोक एका खोलीमध्ये हातामध्ये पत्ते घेऊन गोलकरून जुगार खेळताना दिसून आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे सहाय्यक फौजदार साबळे गुन्हयाचा पुढील अधिक तपास करत आहेत.

Web Title: Action against eight gamblers at Mandvagan Farata in Shirur; Two lakh items confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.