लग्न करत नसल्याच्या रागातून वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुणीवर अॅसिड हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 21:23 IST2019-06-14T21:22:14+5:302019-06-14T21:23:42+5:30
पुण्यातील बुधवार पेठेत एका तरुणाने तरुणीवर अॅसिड हल्ला केल्याची घटना समाेर आली आहे.

लग्न करत नसल्याच्या रागातून वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुणीवर अॅसिड हल्ला
पुणे : लग्न करत नसल्याचा राग मनात धरुन वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुणीवर एका तरुणाने अॅसिड हल्ला केल्याची घटना बुधवार पेठेत घडली. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. अॅसिड कमी तीव्रतेचे असल्याने तरुणी जखमी झाली नाही. परंतु या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली हाेती. याप्रकरणी एका 30 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली असून आराेपीला पाेलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधीत तरुणी ही बुधवार पेठेतील एका इमारतीत वेश्याव्यवसाय करते. ती मुळची पश्चिम बंगाल येथील आहे. तसेच आरोपीही पश्चिम बंगालमधील आहे. तो तीचा नियमीत ग्राहक होता. तो शिवाजीनगर येथील एका हॉटेलात भांडी धुण्याचे काम करतो. त्यांच्यामध्ये झालेल्या वादातून त्याने आज तीच्या कोठीवर येऊन तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. हे अॅसिड बाथरुम साफ करण्यासाठी वापरण्याचे होते. त्यामुळे तरुणीला कोणतीही जखम झाली नाही. तिला एका खासगी रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तिच्या डोळ्यात व नाकात अॅसिड उडाल्याने तिला थोडा त्रास होत आहे.